पतीपासून वेगळी होत आईवडिलांच्या घरी राहते श्वेता बच्चन, ऐश्वर्याच्या ‘या’ सवयीचा तिला येतो राग !

बिग बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी लेक श्वेता बच्चन नंदा हिनं दिल्लीतील व्यावसायिक निखिल नंदा सोबत लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला 22 वर्षे झाली होती. निखिल रणबीर कपूरचा चुलत भाऊ आहे. अनेकांना एक गोष्टी माहिती नसेल की, श्वेता नंदा सध्या पती निखिल सोबत राहत नाही. महत्त्वाचं म्हणजे त्यांचा घटस्फोट झाला आहे.

श्वेतानं आता तिच्या इंस्टावरील तिचं नावही बदललं आहे. तिनं नंदा हे आडनाव काढून श्वेता बच्चन असं नाव केलं आहे. आता श्वेता गेल्या वर्षभरापासून कुटुंबीयांसोबत आहे. दिल्ली सोडून ती थेट मुंबईला आली आहे. अशात आईवडिलांच्या घरी राहणाऱ्या श्वेताला आता तिची वहिणी ऐश्वर्या रायच्या एका सवयीचा खूप त्रास होत आहे ज्यामुळं ती हैराण आहे.

एका चॅट शोमध्ये बोलताना श्वेताला ऐश्वर्याबद्दल प्रश्न विचारला होता. यावर बोलताना तिनं सांगितलं होतं की, “तिच्या सर्व गोष्टी आवडतात परंतु तिच्या एका गोष्टीमुळं खूप त्रास होतो आणि वाईटही वाटतं. ऐश्वर्या फोन आणि मेसेजला कधीच उत्तर देत नाही. यामुळं तिचा रागही येतो. याचं कारण काय आहे हे काही माहित नाही.

श्वेताला यावेळी असंही विचारलं होतं की, अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये उत्कृष्ट कलाकार कोण आहे तर तिनं भावाची बाजू घेत ऐश्वर्याचं नाव घेतलं होतं. यावेळी श्वेताने भावाची बाजू घेत अभिषेकचं नाव घेतले होते.

श्वेता आणि निखिल यांना दोन मुलं आहे. मुलाचं नाव अगस्त्य आणि मुलीचं नाव नव्या नवेली आहे. सध्या श्वेता मुलांसह आईवडिलाांच्या घरी रहात आहे.