‘या’ २ अभिनेत्यांमुळे शिल्पा शेट्टीच्या करिअरचे झाले नुकसान

 मुंबई – वृत्तसंस्था – एक वेळ अशी होती, जेव्हा बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगन आणि अक्षय कुमार यांच्या मैत्रिची चर्चा जोरदार होती. काही काळानंतर त्यांच्या मैत्रीमध्ये खूपच दुरावा आला. १९९४ मध्ये जेव्हा अजय देवगन आणि अक्षय कुमारने ‘सुहाग’ चित्रपटात एकत्र काम केले हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर खुप हिट ठरला. या चित्रपटाच्या शुटिंगच्या दरम्यान अजय आणि अक्षयचे काही कारणावरुन खूप भांडण झाले. या भांडणाबद्दल ते आजही चर्चा करत नाही.

भांडणानंतर त्यांनी एकमेकांसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. आणि ते दोघे आपल्या कामामध्ये व्यस्त झाले. या दोघांमध्ये फसली ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी. त्यावेळी शिल्पा आणि अक्षय रिलेशनशिपमध्ये होते. दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा मिडियावर जोरदार होती.

शिल्पा स्वतः करिअरच्या शोधात होती. तिला एका प्रोड्यूसरकडून ‘होगी प्यार की जीत’ चित्रपट मिळाला पण अडचण ही होते की, त्या चित्रपटात अजय देवगन मुख्य भूमिकेत होते. त्यावेळी अक्षय आणि शिल्पा रिलेशनशिपमध्ये होते. त्यामुळे शिल्पाने तो चित्रपट नाकारला. काही काळानंतर अक्षय आणि शिल्पा या दोघांचा ब्रेकअप झाला. त्या दोघांनी एकत्र काम करणे, एकमेकांना मदत करणे सोडून दिले.