अजित पवार जेव्हा विटी दांडू खेळतात तेव्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती येथे विटी दांडू खेळून अनेकांची मने जिंकली.अजित पवार यांनी खेळलेल्या या विटी दांडूची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकण्यास मिळत आहे.

पर्यावरण दिनानिमित्त बारामती येथे एन्व्हॉर्यमेंटल फोरम आॅफ इंडियाच्या वतीने मातीतल्या खेळांची जत्रा या उपक्रमाचे आयोजन करण्यात केले होते.या जत्रेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली. मातीतल्या खेळांची जत्रा हा महोत्सव तीन दिवस चालणार असून यामध्ये विटी दांडू,गोट्या, लगोरी, टायर पळविणे यासह अनेक खेळ खेळले जाणार आहे.तर या महोत्सवाचे आयोजन अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांनी केले होते.या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.नेहमी अजित पवार हे राजकारणाच्या व्यासपीठावरून सताधारी पक्षावर निशाणा साधतात.यातून कार्यकर्त्यांची मन जिंकतात.त्याचाच प्रत्यय आज बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात अजित पवारांनी विटी दांडू खेळून आंनद लुटला.