आलिया भटनं शेअर केला ‘असा’ फोटो ! लोक म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ॲक्ट्रेस आलिया भट (Alia Bhatt) सोशल मीडियावर कायमच ॲक्टीव असते. ती तिचे फोटो आणिव्हिडीओ ती अनेकदा चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत असते. कधी कधी तिचा बोल्ड किंवा ग्लॅमरस अवतारही पाहायला मिळतो. पुन्हा एकदा आपल्या फोटोमुळं आलिया चर्चेत आली आहे.

आलियानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात ती वेगळ्याच अंदाजात उड्डाणाचा आनंद घेताना दिसत आहे. समोर आलेल्या फोटोत आलिया दातानं नखं कुरतडताना दिसत आहे. हसताना ती खूप क्युट दिसत आहे. काहींनी तर असंही म्हटलं आहे की, तू एवढी क्युट कशी.

असं होतंय कौतुक
फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. आलिया लिहिते की, टूक अ फ्लाईड मीड कोन्वो. फोटोत तिचे एक्सप्रेशनही लहान मुलासारखे वाटत आहे. तिचा क्युटनेस साऱ्यांना आवडला आहे ज्याचं खूप कौतुक होताना दिसत आहे.

आलियाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तिचा हा अंदाज चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी कमेंट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिचा क्युटनेस चाहत्यांना जास्त आवडल्याचं दिसत आहे.

आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमाच्या निमित्तानं आलिया-रणबीर पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. याशिवाय आलिया करण जोहरच्या तख्त सिनेमातही दिसणार आहे. इतकंच नाही तर तिच्याकडे गंगुबाई काठियावाडी राजामौली यांचा आरआरआर हे सिनेमेदेखील आहेत.