जेव्हा अमर सिंहांनी केली होती जया बच्चन आणि ऐश्वर्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – समाजवादी पार्टीचे नेते अमर सिंह आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत येत असतात. त्यांचं म्हणणं आहे की ते जीवन मृत्यूशी लढा देत आहेत. त्यांची तब्येत खराब आहे असंही सजमत आहे. नुकतंच त्यांनी एक ट्विट करत सांगितलं आहे की, त्यांनी अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबियांवर केलेल्या कमेंट्सचा त्यांना पस्तावा होत आहे. त्यांनी व्हिडीओ शेअर करत जया बच्चन, ऐश्वर्या रॉयसोबत पूर्ण बच्चन कुटुंबावर आक्षेपार्ह कमेंट केली होती.

अमर सिंह यांनी व्हिडीओ शेअर करत बच्चन कुटुंबावर टीका केली होती. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. अमर सिंह म्हणाले होते की, “काल राज्यसभेत जी माझी जुनी साथी होती ती आता साथी राहिलेली नाही. महिलांबद्दल मोठ्या कळकळीनं बोलत होती. म्हणत होती तांत्रिक आंदोलनं आपण थांबवू शकत नाही. पॉर्नोग्राफी किंवा काही घाणेरडी दृश्य टीव्हीवर सुरू असतील तर रिमोट तुमच्या हातात आहे. रिमोट दाबा सर्व ठिक होईल. त्यांनी म्हटलं की, मलाही मुलगी आहे.”

बच्चन कुटुंबावर कमेंट केल्याचा पस्तावा

पुढे अमर सिंह म्हणाले, “तुम्ही आई आहात, पत्नी आहात. आई आणि पत्नीच्या हातात सामाजिक रिमोट असतो. तुम्ही तुमच्या पतीला का नाही सांगत जुम्मा चुम्मा दे दे करू नकोस. असं का नाही सांगत की, पावसात भिजणाऱ्या अभिनेत्रीसोबत आज रपट जाए तो करू नकोस. सुनेला का नाही सांगत की, ऐ दिल है मुश्किलमध्ये तिनं जे सीन दिले ते देऊ नकोस. मुलगा अभिषेकला असं का नाही म्हणत की, यश चोपडाच्या धूम सिनेमात अ‍ॅक्ट्रेस जवळपास न्यूड होते. हे दृश्य पाहून तरुणांवर काय परिणाम होईल?”

अमर सिंह म्हणाले, “घरातील महिला या नात्यानं तुम्ही सदनात भाषण देत आहात. तर आता मुकं आणि बहिरं का झाल्या आहात. पहिल्यांदा आपल्या घरात सुधारणा करा. समाजातील विकृतीला सिनेमा जगतातील भूमिका कारणीभूत आहे. दिलीप कुमार, बिमल राय यांनी आपल्या डोळ्यातून प्रेम दाखवलं होतं. त्यासाठी रपट जईयो आणि लिपट जईयो करण्याची गरज नव्हती पडली.”