डिंपलनं आणलं होतं ‘बिग बी’ यांना नाकीनऊ, आजही विसरले नाहीत अमिताभ बच्चन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन यांचा आपण एक अननोन किस्सा जाणून घेणार आहोत. हा किस्सा आहे 1996 सालचा. खास बात अशी की, हा किस्सा डिंपल कपाडिया हिच्याशी संबंधित आहे. अक्षरश: त्यांच्यावर बंगला गहाण ठेवण्याची वेळ आली होती.

1996 साली अमिताभ बच्चन यांनी बीबीसीएल नावाची प्रॉडक्शन कंपनी सुरू केली होती. काही वर्षांनंतर ही कंपनी बुडाली आणि अमिताभ कर्जबाजारी झाले. त्यांची आर्थिक स्थिती खूप खराब झाली. एका पैशासाठी ते महाग झाले होते. अनेक लोक पैशांच्या वसुलीसाठी घराबाहेर ओरडू लागले. यापैकीच एक होती डिंपल कपाडिया. अक्षरश: पैशांसाठी तिनं बिग बींच्या नाकीनऊ आणले होते. बिग बींना तिच्या या वागण्याचं खूप वाईट वाटलं होतं आणि आजही ही गोष्ट ते विसरलेले नाहीत.

डिंपलनं 1997 साली अमिताभच्या मृत्यूदाता सिनेमात काम केलं होतं. अमिताभनंच हा सिनेमा प्रोड्युस केला होता. परंतु पैशांची चणचण निर्माण झाल्यानं ते कलाकारांची फी देऊ शकले नाहीत. डिंपलचेही पैसे अडकले होते. परंतु त्यांची स्थिती समजून न घेता तिनं त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. सतत फोन करून पैसे मागणं, पैशांसाठी सेक्रेटरीला अमिताभच्या बंगल्यावर पाठवणं, पैशांसाठी सतत तगादा लावणं अशा गोष्टी तिनं सुरू केल्या.

परंतु यानंतर अमिताभ यांचं नशीब उजळलं. यश चोपडाचा मोहब्बते हा सिनेमा आणि केबीसीसारखा शो त्यांना मिळाला. याची त्यांना खूप मदत झाली आणि त्यांचा सुवर्णकाळ परत आला. बिग बी अमिताभ डिंपलचं ते पैशांसाठीचं वागणं आजही विसरू शकलेले नाहीत.