जेव्हा कट्टर प्रतिस्पर्धी आढळराव पाटील आणि आमोल कोल्हे एकमेकांसमोर येतात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – देशभरात सध्या सर्वत्र इलेक्शन फिव्हर आहे. यातच शिरूर मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे आणि त्यांच्याविरोधात शिरूर मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात असलेले शिवसेनेचे खासदार आढळराव पाटील हे एकमेकांसमोर आले. निमित्त होते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३० व्या बलिदान दिनाची. यानिमित्ताने आज तीर्थक्षेत्र वढू – तुळापूर येथे अनेकांनी हजेरी लावली होती. यावेळी हे दोघे कट्टर प्रतिस्पर्धी समोरासमोर आले.

एकमेकांवर कडाडून टीका करणारे प्रतिस्पर्धी अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील हे समोरासमोर आले. हे दोघेही छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला वंदन करण्यासाठी आले होते. एकमेकांचे विरोधक एकमेकांसमोर एकाचवेळी एकाच ठिकाणी आल्याने दोघांनाही अवघडल्यासारखं झालं. पण यावेळी त्यांनी एकमेकांना हस्तांदोलन केले. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट देखील उपस्थित होते.

सर्वात आधी अमोल कोल्हे आणि गिरीश बापट हे समोरा समोर आले. त्यावेळी गिरीश बापट यांनी अमोल कोल्हे यांची गळाभेट घेतली. त्यानंतर अचानक शिवाजीराव आढळराव पाटीलही तिथे आले. त्यावेळी अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील यांनी एकमेकांचे हात हातात घेत हस्तांदोलन केलं.