जेव्हा एक कलाकार ‘फार्मासिस्ट’चं ‘आयुष्य’ जगतो

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जगभरात 25 सप्टेंबर हा दिवस जागतिक फार्मासिस्ट दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आजच का साजरा केला जातो तसेच फार्मासिस्टचं काय महत्त्व आहे याबाबत BVIOPचे अध्यक्ष प्रसन्न पाटील यांनी माहिती दिली आहे. प्रसन्न पाटील हे एक कलाकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत. जागतिक फार्मासिस्ट दिनी त्यांनी या दिवसाचे महत्त्व सांगितले आहे.

 

कशी झाली जागतिक फार्मासिस्ट दिवसाची सुरुवात ?

पुण्यातील भारती विद्यापीठात इंस्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजमध्ये प्रसन्न पाटील यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. प्रसन्न पाटील म्हणाले, “जागतिक फार्मासिस्ट दिवस FIP (International Pharmacentical Federation)ने सुरू केला आहे. 2009 मध्ये याची सुरुवात झाली. या संदर्भात तु्र्कीमधील इस्तांबुल मध्ये फार्मासिस्ट्सची मिटींग झाली. यामध्ये जागतिक फार्मासिस्ट दिवसाची घोषणा झाली. यानंतर जगभरात 25 सप्टेंबर हा दिवस जागतिक फार्मासिस्ट दिवस म्हणून साजरा केला जातो.”

फार्मासिस्टची जबाबदारी

यावेळी कॉलेजमध्ये मार्गदर्शन करताना प्रसन्न पाटील यांनी फार्मासिस्टचा रोल काय असतो आणि किती महत्त्वाचा असतो हेही सांगितले. पाटील म्हणाले की, “समाजातील पेशंटचे काउंसलिंग करणे, औषधांचे प्रमाण सांगणे, डोसेज सांगणे, इतकेच नाही तर मधुमेहासारख्या रोगाचे परिणाम सांगणे, लसीकरणाचे महत्त्व ही फार्मासिस्टची महत्त्वाची जबाबदारी आहे.” असे त्यांनी सांगितले. “या वर्षीच्या फार्मासिस्ट दिवसाचे महत्त्व विशेष आहे. कारण Safe and Effective Medicines for All अशी या वर्षीची थीम होती” असे पाटील यांनी स्पष्ट केले.

प्रसन्न पाटील यांच्याविषयी थोडक्यात…

प्रसन्न पाटील हे स्वत: कलाकार आहेत. त्यांनी सिनेमात अभिनय साकारून कलाकार म्हणून स्वत:ला सिद्ध केलं आहे. बंदिशाळा फेम मुक्ता बर्वे यांच्यासोबतही त्यांनी काम केलं आहे. बंदिशाळा सिनेमातही त्यांनी भूमिका साकारली आहे.

Visit : policenama.com