जेव्हा पत्नी किरणसाठी अनुपम खेरनं प्रसिद्ध अभिनेत्रीला दिली होती धमकी – ‘तुझं करिअर होऊ देणार नाही ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूडमधील एक जुना व्हिडीओ समोर आला आहे जो 2000 सालातील आहे. रितुपर्णो घोष यांचा बाडीवाली हा सिनेमा नॅशनल फिल्म अवॉर्डससाठी नॉमिनेट झाली होती. किरण खेर स्टारर या सिनेमावरून वाद झाला होता. बाडीवाली हा एक बंगाली सिनेमा होता. किरण खेरनं हा सिनेमा प्रोड्युस केला होता. परंतु या सिनेमात किरणचा आवाज रिटा कोईरालचा आहे असं सांगितलं गेलं. रिटा बंगाली सिनेमा आणि टीव्ही मधील फेमस अ‍ॅक्ट्रेस आहे. हा सिनेमा नॅशनल अवॉर्डसाठी सिलेक्ट झाला तेव्हा जुरीचे सदस्य बंगाली डायरेक्टर गौतम घोषनंही हीच गोष्टी नोटीस केली. परंतु अडचण अशी होती की, रिटा कोईरालला डबिंगसाठी कोणतेही क्रेडिट देण्यात आलेले नव्हते. गौतम यांनी रिटाला कॉल केला आणि विचरलं की तू या सिनेमासाठी डबिंग केलं असेल तर तुला नॅशनल अवॉर्ड मिळेल. जर रिटा हो म्हणाली असती तर डबिंगमुळं किरणसोबत तिलाही अवॉर्ड मिळाला असता.

आता एक व्हिडीओ समोर आला आहे. जेव्हा रिटानं ही गोष्ट मान्य केली की, तिन रितुपर्णोच्या सिनेमासाठी आवाज दिल्याचं मान्य केलं त्यानंतर पुढं नेमकं काय झालं.

अनुपम खेरनं दिली होती करिअर संपवण्याची धमकी ?
रिटा कोईरालच्या आवाज ती बात होती की, डायरेक्टर गौतम घोष मानायवलाच तयार नव्हते की, तो रिटाचा आवाज नाही. ते म्हणाले की, जर रिटानं खरं सांगितलं नाही आणि नंतर जर सत्य समोर आलं तर बाडीवाली हा सिनेमा डिस्क्वालिफाय केला जाईल. नंतर रिटानं पॅनिक होत ती गोष्ट सांगितली जी तिला लपवायला सांगितलं होतं. सध्या एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात रिटा कोईराल बाडीवाली सिनेमाच्या दिवसातील काही गोष्टींचा खुलासा करत आहे.

रिटानं सांगितलं की, “मी ऋतु दा (रितुपर्णो घोष) साठी डबिंग केली होती. यासाठी मला पैसेही मिळाले होते. त्या रात्री मला अनुपम खेर यांचा कॉल आला. त्यांनी विचारलं की, मला किती पैसे मिळाले आहेत. मी त्यांना सांगितलं तर ते म्हणाले की, माझ्या डबिंगसाठी त्यांनी वेगळे पैसे ठेवले आहेत. त्यांनी ती रक्कम सांगितली जी कोणत्याही डबिंगासाठी आजवर मिळालेली नाही.” रिटा पुढे म्हणाली, “अनुपम म्हणाले तुला कॅश रक्कम दिली जाईल. उद्या मीडियात एवढंच बोल की, मी सिनेमासाठी डबिंग केलेली नाही.”

अनुपम खेरनं करिअर संपवण्याची धमकी कशी दिली हे सांगताना रिटा म्हणाली, “अनुपम खेर मलाअसंही म्हणाले की, मी तुला बॉलिवूडमध्ये करिअर बनवू देणार नाही. मी हेदेखील पाहतो की, तू कोलकात्यात कसं काम करतेस.” अशी धमकी त्यांनी दिल्याचंही रिटा सांगते. त्या काळी नॅशनल अवॉर्ज जुरींसाठी कठिण वेळ होती. नंतर फिल्मच्या मेकर्सकडून त्यांना एक डिक्लेरेशन देण्यात आलं की, सिनेमा डब झालेला नाही. नंतर जुरींनी त्यांचा निर्णय घेतला आणि किरण खेरला बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला. रिटा कोईरालचा कोणताही उल्लेख झाला नाही. अनेक वर्षांनंतर रितुपर्णो घोष यांनीही हे मान्य केलं होतं की, जे काही झालं ते चुकीचं झालं आहे. त्यांना याचा पस्तावा होता. त्यांनी हेही सांगितलं की, नॅशनल अवॉर्ड जिंकल्यानंतर मिळालेले पैसे त्यांनी रिटासोबत वाटण्याचा प्रयत्नही केला होता. इतकंच नाही तर त्यांनी हेही सांगितलं की, अनुपम खेरनं प्रोड्युसर या नात्यानं सत्य सांगणंही त्यांच्यासाठी कठिण केलं होतं.