अवधुत गुप्तेंच्या ‘त्या’ टोमण्यावर आदित्य ठाकरे ‘क्लीन बोल्ड’, प्रेक्षकांनीही दिली ‘दाद’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – संगमनेर इथं आयोजित केलेल्या युवा महोत्सवात महविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदारांनी हजेरी लावली होती. त्यावेळी अवधूत गुप्ते आणि पर्यटनमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे त्यांच्यात चांगलीच मैफिल रंगली. त्यामुळे अवधूत गुप्ते यांनी लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नावर दोघांतही जुगलबंदी रंगली. अवधूत गुप्ते म्हणाले की, आईने किती दिवस आता जबाबदारी घ्यायची? त्यावर आदित्य म्हणाले, आता सगळी जबाबदारी आईने मुख्यमंत्री साहेबांवर टाकली आहे. त्यावर सगळीच जबाबदारी म्हणजे? असा प्रश्न करत अवधूत यांनी सोशल मीडियावरच्या चर्चेचा उल्लेख करत हिंदीत कमेंट केली. ‘आपका उत्तर हमको ‘पटनी’ चाहिये? असं म्हणत त्याने दिशा पाटनी आणि आदित्यबद्दलच्या चर्चेचा उल्लेख केला, त्यावर आदित्यनेही अवधूतला तुझ्या प्रश्नांची ‘दिशा’ चुकली असा टोला लगावला. यावर प्रेक्षकांमधून दिशा…दिशा…अश्या घोषणा येऊ लागल्या, दरम्यान, सगळी जबाबदारी दिली मात्र त्याबद्दल अजुन काही ठरलं नाही असंही सांगून टाकलं. मात्र प्रेक्षकांच्या घोषणेने आदित्यही काहीसा लाजून गेला.

आदित्य आणि अभिनेत्री दिशा पाटनी यांच्यातील मैत्री चांगलीच चर्चेत आहे. अनेकदा त्या दोघांच्या भेटीचे फोटोस सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अवधूतने विचारलेल्या प्रश्नावर आदित्य क्लिन बोल्ड झाल्याचं बघायला मिळालं. ज्यावर प्रेक्षकांनीही चांगले टोमणे मारले.

दरम्यान, यावेळी काँग्रेस आमदार धीरज देशमुख, राष्ट्रवादीचे रोहित पवार, अदिती तटकरे, आदित्य ठाकरे आणि ऋतुराज पाटील या सगळ्याच तरुण आमदारांनी दिलखुलास उत्तरं दिली. या कार्यक्रमावेळी जादूच्या फोनवरून इच्छित व्यक्तीशी बोलण्याचा अभिनय करण्याचा राऊंडवेळी अवधूत गुप्ते यांनी प्रत्येकाच्या हातात फोन देऊन त्यांना बोलायला सांगितलं. आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कॉन्फरन्स कॉल करून त्यांच्याशी बोलण्याचा उत्तम अभिनय केला.

आदित्य म्हणाले कि, तुम्हा सगळ्यांशी बोलताना मला आनंद होत आहे. महाराष्ट्रात महाघाडीचं सरकार आलं आहे. ते सरकार पाच वर्ष उत्तम पद्धतीने चालेल, यासाठी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. आदित्य यांच्या या फोन कॉलवर सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवत चांगला प्रतिसाद दिला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/