चोरी करताना पकडली गेली होती अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी

पोलीसनामा ऑनलाईनः बंगाली अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी ( bengali actress swastika mukherjee) 40 वर्षाची झाली असून आज तिचा वाढदिवस आहे. 13 डिसेंबर 1980 रोजी कोलकात्यात जन्मलेली स्वस्तिका बंगाली अभिनेता संतू मुखर्जीची मुलगी आहे. बंगाली टीव्ही मालिका ‘देवदासी’पासून तिच्या अ‍ॅक्टिंग करिअरला प्रारंभ झाला. 2001 मध्ये ‘हेमंतर पाखी’ या सिनेमातून तिने डेब्यू केला. पुढे 2008 मध्ये तिने मुंबई कटिंग या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्येही डेब्यू केला. याच स्वस्तिकावर कधीकाळी चोरीचा आरोप झाला होता.

होय, 2014 मध्ये सिंगापूरमध्ये एका ज्वेलरी मॉलमध्ये गोल्ड इअर रिंग्स बॅगमध्ये ठेवताना ती पकडली गेली होती. ती आपल्या बॉयफ्रेन्डसोबत या ज्वेलरी स्टोरच्या लॉन्चिंग इव्हेंटला गेली होती. यानंतर शॉपच्या मालकाने फिल्म फेस्टिवलच्या आयोजकाविरूद्ध तक्रारही केली होती. दरम्यान स्वस्तिकाने हे चुकून घडल्याचे म्हटले होते. मे 2014 मध्ये स्वस्तिका अचानक चर्चेत आली होती. बॉयफ्रेन्ड सुमनच्या अटकेविरोधात तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यानंतर तिला रूग्णालयात दाखल केले होते. वयाच्या 18 व्या वर्षीच स्वस्तिकाने लग्न केले होते. मात्र दोन वर्षांनंतर दोघांचाही घटस्फोट झाला. ती एका मुलीची आई आहे. स्वस्तिकाने गरोदरपणात पतीने मारहाण केल्याचा आरोप केला होता.

स्वस्तिका ख-या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे. दिल बेचारा या सिनेमात स्वस्तिकाने एक कर्करोगाने पीडित तरूण मुलीच्या आईची भूमिका साकारली आहे. कडक शिस्तीची, प्रसंगी हळवी आई तिने साकारली आहे. दिल बेचारा या सिनेमाआधी स्वस्तिका ‘पाताल लोक’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती. यात तिने डॉली मेहताची भूमिका साकारली होती. स्वस्तिका ख-या आयुष्यात प्रचंड क्रिएटीव्ह आहे. केसांसोबत आणि लूकसोबत नवेनवे प्रयोग करणे तिला आवडते.