अन् CM ठाकरे मध्यरात्री विश्वास नांगरे पाटलांना फोन करतात तेव्हा..

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – थर्टी फर्स्टच्या मध्यरात्री राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देणारा संदेश पाठवला. त्यानंतर सुखद धक्का देणारा मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला. विश्वासराव मला या नवीन वर्षाची सुरुवात माझ्या मुंबई पोलीस दलातील बहाद्दर जवानांसोबत करायची आहे. रात्रभर तुम्ही काम करून थकाल. मी दुपारी एक वाजता येतो, असे मुख्यमंत्री फोनवर म्हणाल्याचे मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले. खुद्द नांगरे पाटील यांनी याबाबत फेसबुक पोस्ट लिहून माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईत पोलीस आयुक्तालयात पोलिसांसोबत वेळ व्यतित केला. कोरोना काळात पोलिसांनी केलेल्या कामगिरीबाबत यावेळी मुख्यमंत्र्यांनी पोलीस दलाचे आभार व्यक्त केले होते. तसेच राज्याच्या पोलीस दलाचे कर्तृत्व हे सूर्य प्रकाशा एवढे स्वच्छ असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले होते.

 

 

 

 

 

‘विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे पोलीस दलाला नववर्षी बळ मिळाल्याचे म्हटले आहे. कोरोनाशी लढा देताना गेले वर्षभर 98 अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले. हजारोजन योद्धया प्रमाणे या आजाराशी झुंजले. कोरोना शहीदांच्या कुटुंबियांना शासनाकडून मिळणारी 50 लक्ष आणि पोलीस आयुक्तांच्या पुढाकाराने मिळणारी 10 लक्ष मदत ही पथदर्शी आहे.अशा कर्मचाऱ्यांसाठी राज्याच्या प्रमुखांची अशी दिलासादायक भेट ही मनोबल वाढवणारी ठरली असल्याचे नांगरे पाटील यांनी म्हटले.