Coronavirus : अखेर कधी पर्यंत ‘कोरोना’ महामारीचा होईल अंत आणि कसं होणार शक्य ?, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना ही एक अशी महामारी आहे, ज्याचा परिणाम जवळजवळ संपूर्ण जगामध्ये झाला आहे. ४० लाखाहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. या महामारीमुळे २ लाख ८० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील डॉक्टर आणि शास्त्रज्ञ या महामारीवर उपचार शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, पण यश अद्याप दूर आहे. मात्र जगासमोर एक महामारी पहिल्यांदाच आली आहे असे नाही.

जगातील सर्व देशांनी यापूर्वी महामारी पाहिली आहे आणि त्यावर नियंत्रण आणले आहे. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार महामारी संपवण्याचे दोनच मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे उपचार किंवा लस, ज्यामुळे संक्रमण आणि मृत्यू रोखता येतील. दुसरा मार्ग म्हणजे महामारीमुळे लोकांच्या मनात असलेली भीती दूर करणे.