जेव्हा दाऊद इब्राहिमला भेटले होते ऋषी कपूर, नाकारली होती अंडरवर्ल्ड डॉनची ‘ऑफर’, केले अनेक धक्कादायक खुलासे

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूडमधील महान अभिनेते ऋषी कपूर यांचं काल (गुरुवार दि 30 एप्रिल) निधन झालं. त्यांच्या जाण्यानं सिनेमा जगताला मोठा धक्का बसला आहे. 67 वर्षीय ऋषी कपूर यांनी त्यांच्या पुस्तकात अनेक असे खुलासे केले आहेत ज्यामुळं प्रत्येकजण हैराण होईल. खुल्लम खुल्ला असं या पुस्तकाचं नाव आहे.

दाऊदसोबत भेट

ऋषी कपूर यांनी त्यांच्या पुस्तकात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत भेट झाल्याचं मान्य केलं आहे. एकदा नाही तर दोनदा भेट झाल्याचं त्यानी सांगितलं आहे. त्यांची अत्मकथा खुल्लम खुल्ला या पुस्तकाची विक्री तेव्हा अचानक वाढली जेव्हा त्यांचा दाऊदच्या भेटीचा किस्सा समोर आला होता.

दुबईत अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला भेटले होते ऋषी कपूर

जेव्हा ऋषी कपूर यांचं करिअर पीकवर होतं तेव्हा ते दाऊदला भेटले होते. ऋषी यांच्या पुस्तकात असा उल्लेख आहे की, 1988 मध्ये त्यांची आणि दाऊदची भेट झाली आहे. तेव्हा मुंबईवर हल्ला झाला नव्हता. त्याआधीही तो बदनाम होता. पुस्तकात केलेल्या उल्लेखानुसार, दुबईत एक म्युझिकल इव्हेंट होता. यावेळी ऋषी आणि दाऊद यांची भेट झाली होती. दाऊदचा उजवा हात म्हणवला जाणारा बाबा फोन घेऊन ऋषींकडे आला आणि दाऊदनं त्यांना फोनवरूनच घरी येण्यासाठी आमंत्रण दिलं होतं.

दाऊदसोबत पिला होता चहा

ऋषी यांनी पुस्तकात उल्लेख केला आहे की, त्यांना घेण्यासाठी एक रॉल्स रॉयस कार आली होती. कारनं त्यांना खूप गोल फिरवलं होतं जेणेकरून त्यांना दाऊदचा ठिकाणा समजू नये. दाऊदनं आलिशान बंगल्यात त्यांचं स्वागत केलं. दोघांनी चहा बिस्किट खाल्लं. ऋषी यांनी पुस्तकात सांगितलं की, दाऊद ना ही मद्यपान करायचा आणि ना ही कोणाला मद्य द्यायचा. दोघांनी कोर्टात झालेला मर्डर आणि बॉलिवूडबद्दल गप्पा मारल्या. यानंतर ते परतले होते.

बुटच्या शोरूमध्ये झाली दुसरी भेट

दोघांच दुसरी भेट दुबईतल्याच शोरूममध्ये झाली होती. ऋषी कपूर आणि पत्नी नीतू सिंह शुज खरेदी करण्यासाठी आले होते. त्यावेळी दाऊदही तिथं त्याच्या 8-9 बॉडीगार्डसोबत आला होता. त्यानं ऋषी यांना ऑफर दिली. त्याला त्यांच्यासाठी काही खरेदी करायची होती.

ऋषी कपूरनं नाकारली होती ऑफर

ऋषी यांनी एकदा नाही तर दोनदा दाऊदची ऑफर नाकारली होती. पहिल्या भेटीनंतर दाऊद त्यांना म्हणाला होता की, काही लागलं तर मला सांगा कितीही पैसे लागले तरी सांगा. न घाबरता ऋषी यांनी त्याची ऑफर नाकारली होती. ऋषी यांचे वडिल राज कपूर यांचं निधन झाल्यानंतर दाऊदनं त्याचा खास माणूस बाबा याला त्यांच्या घरी श्रद्धांजली देण्यासाठी पाठवलं होतं.