जेव्हा दिशा पटानीने नोरा फतेहीला नेसवली साडी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिशा पटानी आणि नोरा फतेही या दोघीही त्यांच्या क्षेत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. या दोन्ही अभिनेत्रींचे लाखो-करोडो चाहते आहेत. या दोघीही सोशल मीडियावरही चांगल्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. या दोघींचे फोटोज् आणि व्हिडिओज् अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होत असतात. या दोघींची मैत्रीही चांगलीच घट्ट आहे. नोराने एक फोटो शेअर करून सांगितले होते, की दिशाची कशी मदत करत आहे.

दिशा पटानी हिने नोरा फतेहीला साडी नेसण्यासाठी मदत केली होती. नोरा हिला ‘बिग बी’ अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या दिवाळी पार्टीत जायचे होते. त्यासाठी तिने दिशाची मदत घेतली होती. याशिवाय नोराने इन्स्टाग्रामवर दिशाचे आभार मानले. या थ्रोबॅकचा फोटोत नोरा ब्लॅक आणि गोल्ड रंगाच्या साडीत तयार होऊन उभी राहिल्याचे दिसत आहे. तर दिशाने कॅज्युअल ग्रीन कुर्ता घातला आहे. नोराने या आउटफिट अमिताभ बच्चन यांच्या फेमस दिवाळी बॅशमध्ये घातले होते. तसेच टिकली आणि ट्रॅडिशनल ज्वेलरीला आउटफिटसह मॅच केले होते. नोराने फोटोच्या कॅप्शनमध्ये याचे श्रेय दिशा पटानीला दिले आहे. तिने लिहिले, की साडी नेसवण्यासाठी मदत केल्याबद्दल धन्यवाद. तूच माझा आधार आहेस.

अनेक गाण्यांवर नृत्य
नोरा फतेहीने दिलबर गाण्यावर केलेल्या नृत्यामुळे लोकांचे लक्ष वेधले होते. फिल्म ‘सत्यमेव जयते’च्या या गाण्यामुळे तिला प्रसिद्ध मिळाली. त्यानंतर तिने बाटला हाऊस फिल्मच्या गाण्यात ‘ओ साकी साकी’ आणि स्ट्रीट डान्सर 3D मध्ये गाण्यावर नृत्य केले.