#VideoViral : अमिताभ बच्चन नाव ऐकताच मंचावर बसलेल्या रेखा लाजल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांनी नुकतीच सिंगिंग रिअॅलिटी शो रायजिंग स्टार ३ मध्ये उपस्थिती दाखवली होती. मंचावरील प्रमुख पाहुण्या म्हणून त्या आल्या होत्या. सलाम-ए-रेखा या नावाने हा कार्यक्रम खास रेखा यांना डेडीकेट करण्यात आला. यावेळी एक खास क्षण पाहायला भेटला. सेटवर अचानक महानायक आणि बिग बी अशी ओळख असणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या नावाचा उल्लेख आला तेव्हाचा क्षण खूपच अविस्मरणीय ठरला.

या कर्यक्रमात स्टेजवर सादरीकरण करण्यासाठी चेतन बृजवासी, ओप्संग आणि विश्वजा हे स्पर्धक आले होते. यावेळी तिघांना वेगवेगळा गेटअप केला होता. यावेळी चेतनला पाहून रेखा म्हणाल्या, “आपण कोणाचा गेटअप केला आहे ? कोणत्या स्टारचा लुक आहे का ? यावर उत्तर देताना चेतन म्हणाला की, “मी अमिताभ बच्चन बनलो आहे.”

https://www.instagram.com/p/BwieOXUg5-H/?utm_source=ig_embed

चेतनने दिलेले हे उत्तर रेखा यांनी ऐकले. यानंतर रेखा क्षणातच लाजल्या. सर्वांच्या नजरा यावेळी रेखा यांचे हावभाव टीपत होत्या. रेखा यांच्या चेहऱ्यावर लाजण्यासोबतच स्मितहास्य फुलले होते. चेतनचे उत्तर ऐकून त्यांना काय बोलावे हेही सुचेना झाले होते. त्यांनी खूपदा माईक तोंडाजवळ आणला खरा परंतु त्या काहीच बोलू शकल्या नाहीत. यावेळी उर्वरीत दोन स्पर्धक विश्वजा आणि ओप्संग यांनी रेखा आणि शशी कपूर यांचा गेटअप केल्याचे त्या दोघांनी रेखा यांना सांगितले.

https://www.instagram.com/p/Bwigv5qAK4s/?utm_source=ig_embed

मंचावर पुन्हा एकदा रेखा यांच्या सौंदर्याची जादू पाहायला मिळाली. त्यांनी ट्रॅडिशनल लुक केला होता. गोल्डन आणि सी ग्रीन कलरची साडी त्यांनी नेसली होती. गळ्यात कुदंन नेकलेसही उठून दिसत होता. रेखा खूपच सुंदर दिसत होत्या. त्यांनी पहिल्यांदा पूर्ण नाव घेत आपल्या नावाचा अर्थही सांगितला.

https://www.instagram.com/p/Bwigv5qAK4s/?utm_source=ig_embed