‘व्होकल फॉर लोकलचा संकल्प लक्षा ठेवा’ : PM मोदी

पोलीसनामा ऑनलाईन :  – विजयादशमीनिमित्त ( दसऱ्या) देशवासीयींना शुभेच्छा देत पंतप्रधान मोदींनी (prime-minister-modi) आजच्या मन की बात कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. विजयादशमीचे पर्व हे असत्यावर सत्याच्या विजयाचे व एकप्रकारे संकटावर धैर्याच्या विजयाचे देखील पर्व असल्याचे सांगितले. तसेच, सण-उत्सवांच्या काळात बाजारपेठेत खरेदीसाठी (shopping) बाहेर पडताना व्होकल फॉर लोकलचा (vocal-for-local) आपला संकल्प नक्कीच लक्षात ठेवा, असे आवाहनही त्यांनी देशवासीयांना यावेळी केले. बाजारातून सामान खरेदी करतेवळी आपल्याला स्थानिक उत्पादनांना प्राथमिकता देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, जेव्हा आपण सण, उत्सवांबद्दल बोलतो, तयारी करतो. तेव्हा मनात हे येते की बाजारात कधी जायचे, खरेदी करायचे. विशेषतः मुलामध्ये याचा मोठा उत्साह असतो. सणांचे हा उत्साह व बाजारातील चमक एकमेकांशी जोडली गेली आहे. मात्र यंदा तुम्ही जेव्हा खरेदीसाठी जाणार आहात, तेंंव्हा व्होकल फॉर लोकलचा आपला संकल्प लक्षात ठेवा. तसेच, आज तुम्ही सर्वजण अत्यंत संयमाने जगत आहात. मर्यादेत राहून उत्सव साजरा करा. यामुळे जी लढाई आपण लढत आहोत. त्यात आपला विजय देखील निश्चित आहे. पूर्वी नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी होत असत. मात्र यंदा असे होऊ शकले नाही. पूर्वी दसऱ्याला मोठमोठ्या जत्रा भरत होत्या. मात्र यंदा त्यांचे स्वरूप देखील वेगळचे आहे. रामलीलाच्या उत्सवाचे देखील आकर्षण होते. मात्र त्यावर देखील निर्बंध आले. पूर्वी नवरात्र काळात गुजरातच्या गरब्याचा आवाज धुमधमुत होता. मात्र यंदा ते देखील बंद आहे. आता पुढे आणखी उत्सवं येणार आहेत. ईद, शरद पोर्णिमा, वाल्मिकी जयंती, धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज, गुरूनानक जयंती आदी उत्सव आहेतच. मात्र, करोनाच्या संकट काळात आपल्याला संयमानेच वागायचे असल्याचे ते म्हणाले.