मग मोफत न दिल्याने बीअर शॉपीवर  गुंडांचा हल्ला 

नागपूर  : पोलीसनामा ऑनलाईन 

बीअर पिण्याचा मग (ग्लास) मोफत दिला नाही म्हणून एका बीअर शॉपीवर सशस्त्र गुंडांनी हल्ला चढवला. शॉपीमधील एका तरुणावर तलवारीने हल्ला करून हिमांशु चौरावार नामक तरुणाला जबर जखमी केले.

[amazon_link asins=’B0193DSOC0,B07BTZYBGB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’03279281-a774-11e8-be83-7912ad075ecc’]

याबाबत पोलिसांनी सांगितले की, जयदुर्गा ले-आऊट नरेंद्रनगरमध्ये राहणारे राजू दामोदर रेड्डी (वय २९) यांची अमरावती मार्गावर झिरो बीअर शॉपी आहे. तेथे बुधवारी रात्री १० च्या सुमारास तीन तरुण आले. त्यांनी तेथून बीअर घेतल्यानंतर सुरू असलेल्या स्कीमनुसार बीअरचा एक मग जास्त मागितला. तो दिला नाही म्हणून आरोपींनी रेड्डी तसेच त्यांच्या दुकानात काम करणारा चौरावार याला शिवीगाळ करून निघून गेले. काही वेळेनंतर पाच ते सहा आरोपी तलवारीसह बीअर शॉपीत आले. एक बीअर का मग न देने की किमत क्या है, ये तुमको बताते, असे म्हणत आरोपींनी बीअर शॉपीत तोडफोड सुरू केली. एकाने चौरावार याच्यावर तलवारीने हल्ला चढवला तर, काहींनी बाहेर निघताना बीअर शॉपीवर दगडफेक केली. तोडफोड करून आरोपी पळून गेले. रेड्डी यांनी अंबाझरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींची शोधाशोध सुरू केली.