जेव्हा रोमँटीक सीनपूर्वी हुमा कुरेशी नवाजुद्दीनला म्हणाली होती ‘भाई’ ! अभिनेत्यानं केली डायरेक्टरकडे ‘तक्रार’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार नवाजुद्दीन सिद्दीकी आज आपला 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. 1999 मध्ये आलेल्या आमिर खानच्या सरफरोश सिनेमातून त्यानं डेब्यू केला होता. गँग्स ऑफ वासेपूर हा सिनेमा त्याच्यासठी टर्निंग पॉईंट ठरला होता. आज आपण काही मजेदार किस्से जाणून घेणार आहोत.

अनुराग कश्यप डायरेक्टेड गँग्स ऑफ वासेपूर सिनेमातील अनेक मजेदार किस्से नवाजनं शेअर केले होते. नवाजनं शुटींदरम्यान कोस्टार हुमा कुरेशीची एका गोष्टीवरून तक्रारही केली होती. नवाजनं सांगितलं होतं की, आम्हाला एक रोमँटीक सीन द्यायचा होता हुमानं मला नवाज भाई म्हणायला सुरुवात केली. मी अनुराग कश्यपना म्हणालो ही तर मला भाई म्हणत आहे अशात मी रोमँटीक सीन कसा देणार. यानंतर कश्यप यांनी फक्त स्मित हास्य केलं. नंतर शॉट ओके आला होता.

याशिवाय नवाजनं आणखी एक मजेदार किस्सा ऐकवला होता. हुमा आणि नवाज पहिल्यांदा डेट करताना गार्डनमध्ये भेटताना एक सीन आहे. यात एक सीन आहे की, नवाज बोलताना हुमाच्या हातावर हात ठेवतो. यावर हुमा म्हणते, हे चांगलं नाही. आधी परवागनी घ्यायला हवी ना. हे ऐकल्यावर नवाज उदास होतो. यामधील खास बात अशी आहे की, हा नवाजचा रिअल लाईफ किस्सा आहे.