‘मी आमदार होतो, तेव्हा तुम्ही शाळेत होता’, भुजबळांकडून मुख्यमंत्र्यांची ‘शाळा’

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेचा समारोप परळीतून करण्यात आला या सभेदरम्यान बोलताना माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला ” मी घाबरणार नाही जगेल तर सिंहासारखा जगेल. आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनाकडून काय बोलायचे ते शिकायचे का ? फडणवीसांना माझ्या कुठल्या भाषणाचा राग आला ,हे त्यांनी सांगावं. अहो, मी ज्यावेळी मुंबईचा महापौर होतो त्यावेळी तुम्ही शाळेत होता. हे लक्षात ठेवा आणि आता मी काय बोलावे हे तुमच्याकडून शिकायचे का ? असा सवाल करीत भुजबळांनी फडणवीसांची शाळा घेतली.

यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, ‘वारे शासन तेरा खेल, न्याय मांगा, मिला जेल, असे म्हणत मी नकलाकार आहे. तर एवढी धडकी का भरली, असा प्रश्‍नही भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. तसेच मी ज्यावेळी मुंबईचा महापौर होतो, मुंबईत आमदार होतो. त्यावेळी आपण शाळेत होता अन् आता मी काय बोलायचं हे तुमच्याकडून शिकायचं का ? असा प्रश्नही भुजबळ यांनी फडणवीस यांना विचारत त्यांच्यावर टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आयच्या संयुक्त जाहीर सभेत छगन भुजबळ बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नवाब मलिक, आ.रामराव वडकुते, पीआरपी पक्षाचे अध्यक्ष आ.प्रा.जोगेंद्र कवाडे, रजनी पाटील, सुमन आर.आर.पाटील, पद्मसिंह पाटीलांसह दिग्गज नेते उपस्थितीत होते.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री ?

“काँग्रेसला सभेला माणसे जमवण्यासाठी असे नकलाकार आणावेच लागतात. छगन भुजबळ म्हणाले ‘मांगा न्याय मिली जेल’ , जणू काही भुजबळ भारताच्या स्वातंत्र्य युद्धासाठी न्याय मागत होते, असा आव आणला होता पण भुजबळांनी हे लक्षात घेतले पाहिजे की त्यांनी भ्रष्टाचार केला होता म्हणून त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आले होते. ते बेलवर आहेत हे लक्षात ठेवावे. अशी कोपरखळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड येथे बोलताना मारली. भारतीय जनता पक्षाच्या नांदेड जिल्ह्यातील बूथप्रमुख व शक्तीकेंद्रप्रमुखांचा भक्तीलॉन्स येथे मार्गदर्शन मेळावा झाला. या मेळाव्यात बोलतान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छगन भूजबळ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता.

You might also like