खळबळजनक ! ‘सपा’च्या अबू आजमींनी मागितला PM मोदींच्या आईच्या जन्माचा पुरावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – समाजवादी पार्टीचे नेते अबू आजमी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जहरी टीका केली आहे. जेव्हा मुस्लिम समाज देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते, तेव्हा मोदी-शहांची माणसे इंग्रजांशी संधान बांधून आपल्याच देशबांधवांच्या विरोधात कारवाया करत होते असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मुंब्र्यातील शाहीन बाग येथील जनआंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी हे विधान केलं आहे.

देशामध्ये अनेक दिवसांपासून सीएए बाबत एका गटामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आणि त्यामुळेच अनेक लोक रस्त्यावर उतरून त्याबाबत आपला विरोध व्यक्त करत आहेत. त्याच अनुषंगाने अबू आजमी यांनी मोदी – शहावर निशाणा साधला आहे. इतरांची जन्मप्रमाणपत्र मागविण्याआधी मोदी यांनी आपल्या आईच्या जन्माचा दाखला आणावा, असे वक्तव्य अबू आजमी यांनी केले आहे.

गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देखील जहरी टीका –
आजमी यांनी यावेळी गृह मंत्री अमित शहा यांच्यावर देखील जहरी टीका केली. ते म्हणाले, जे पद सरदार पटेलांनी भूषविले होते त्याच पदावर अमित शहांसारखी व्यक्ती बसली आहे, हे देशाचे दुर्दैव आहे. तसेच शहा हे तुरुंगवास भोगून आले असल्याने त्यांनी या पदावर बसने हे अपमानजनक आहे असे अबू आजमी यावेळी म्हणाले. एवढेच नाही तर सर्व गुजराती समाजाला आजमी यांनी इंग्रजांचे दलाल म्हणून संबोधले.

फेसबुक पेज लाईक करा –