‘ही’ इच्छा पूर्ण झाली म्हणून जया बच्चन यांनी पुण्याच्या दगडूशेठ गणपतीला अर्पण केली होती सोन्याची ‘कर्णफुले’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गणेशउत्सवात अनेक भक्त बाप्पा समोर आपली इच्छा मागत असतात आणि स्वइच्छेने आपले छोटे मोठे दान देत असतात कोणी दानपेटीत दान टाकतो तर कोणी पैशांच्या स्वरूपात दान करतो. देशातील अनेक भागात गणेशउत्सव मोठ्या धाटामाटात पार पडतो या वेळी मोठे उद्योजक, सेलिब्रेटी असे सगळेच लोक बाप्पा चरणी नतमस्तक होतात.

अनेक सेलिब्रेटी लोक या काळात बाप्पाची मनोभावे सेवा करतात आणि बाप्पाकडे हवे ते मागतात. गणपती बाप्पावर निस्सिम प्रेम करणाऱ्या अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनी एका खास कारणामुळे काही वर्षांपूर्वी पुण्यातील दगडूशेठ गणपतीला सोन्याची कर्णफुले अर्पण केली होती.

का केली होती जयाबच्चन यांनी दगडुशेठ चरणी सोन्याची कर्णफुले अर्पण –
‘कुली’ या चित्रपटाच्या सेटवर बिग अर्थात अमिताभ बच्चन एका सीनदरम्यान गंभीर जखमी झाले होते.
अमिताभ यांचे प्राण वाचावेत यासाठी यावेळी संपूर्ण देश प्रार्थना करत होता यावेळी जया बच्चन यांनीही पुण्याच्या दगडूशेठ गणपतीला अमिताभ यांचे प्राण वाचविण्यासाठी साकडं घातलं होतं अमिताभ यांचे प्राण वाचले आणि इच्छापुरती झाली म्हणून जया बच्चन यांनी दगडूशेट चरणी सोन्याची कर्णफुले अर्पण केली.

नेमकं काय झालं होत त्यावेळी कुलीच्या सेटवर
१९८२ साली ‘कुली’च्या सेटवर अमिताभ जखमी झाले होते. एका मारहाण दृष्यात पुनित इस्सारचा ठोसा चुकवण्याच्या प्रयत्नात अमिताभ यांच्या पोटात टेबलाचा कोपरा लागला होता. मार इतका गंभीर होता की अमिताभ यांना लगेच दवाखान्यात दाखल व्हावे लागले. आजही कुली चित्रपटाच्या त्या सिनवेळी अमिताभ गंभीर जखमी झाल्याचे लिहून येते.