Birthday SPL : लग्न करून देखील आयुष्यभर एकट्याच राहिल्या जयाप्रदा ! काय आहे कारण ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सिनेमात अनेक वर्ष राज्य केल्यानंतर आता अभिनेत्री जयाप्रदा (Jaya Prada) राजकारणात जास्त सक्रिय आहेत. अभिनेत्री ते नेता बनलेल्या जयाप्रदा यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी वेळोवेळी सांगितल्या होत्या. आयुष्यात वाईट काळात कोणी त्यांना साथ दिली, कधी त्यांना सुसाईड करावंही वाटलं होतं असे अनेक सिक्रेटही त्यांनी खूपदा सांगितलं होतं. त्यांचं खरं नाव ललिता राणी (Lalitha Rani) आहे. आज (दि 3 एप्रिल) त्या आपला वाढदिवस साजरा करत आहेत. आद त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

जयाप्रदा यांचा जन्म 3 एप्रिल 1962 रोजी मध्य आंध्रातील राजाहमुंडरी येथे झाला आहे. त्यांचे वडिल कृष्णा राव हे तेलगू सिनेमांचे फायनान्सर होते. त्यांचं आयुष्य सुरूवातीपासूनच रहस्यांनी भरलेलं असं राहिलं आहे.

जयाप्रदा यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी 1986 मध्ये प्रोड्यसर श्रीकांत नाहटा सोबत लग्न केलं. यावेळी त्यांचं करिअर यशाच्या अत्युच्च शिखरावर होतं. त्यांनी अचानक लग्नाचा निर्णय घेतला होता. जया श्रीकांतची दुसरी पत्नी होती. त्यावेळी या लग्नानं खूप राडा झाला होता. कारण श्रीकांतनं पत्नी चंद्राला घटस्फोट दिला नव्हता. तरीही त्यांचं लग्न झालं होतं. नंतर दोघींमध्ये सहमती झाली आणि जयाप्रदा आणि चंद्रा सोबत राहू लागल्या. जयासोबत लग्न केल्यानंतरही श्रीकांतला चंद्राकडून मुलं आहेत. श्रीकांत आणि चंद्रा यांची 3 मुलं आहेत. मात्र जया आणि श्रीकांत यांना मूल नाही. एका मुलाखीत त्यांनी मुलाचीही इच्छा बोलून दाखवली होती.

80 च्या दशकात जयाप्रदा या आघाडीच्या अ‍ॅक्ट्रेस होत्या. या दरम्यान त्यांच्या घरी इनकम टॅक्सची रेड पडली. हा त्यांच्या आयुष्यातील वाईट काळ होता. रेड पडल्यानंतर जयाप्रदा यांच्या करिअरचा ग्राफ अचानक खाली आला. श्रीकांत नाहटा यांनी त्यांना साथ दिली. यात काळात त्यांची मैत्री झाली आणि पुढं प्रेम. त्या प्रेमात जणू पागल झाल्या होत्या. श्रीकांतनं पत्नी चंद्राला घटस्फोट दिला नव्हता. तरीही त्यांचं लग्न झालं होतं. ही बातमी साऱ्यांनाच धक्का देणारी होती. विशेष म्हणजे जयाप्रदांसोबत लग्न केल्यानंतरही श्रीकांत नाहटा यांना पहिल्या पत्नीपासून मूल झालं होतं. एकंदर काय तर लग्न करूनही त्या कायम एकट्या राहिल्या. त्यांना मूल नसल्यानं त्यांनी बहिणीच्या मुलाला दत्तक घेतलं आणि त्याचं पालनपोषण केलं.

जयाप्रदा लग्नानंतरही सिनेमात काम करत होत्या. परंतु हळूहळू त्यांना सिनेमा मिळणं बंद झाला. त्यांनी लहान पडद्यावर देखील काम केलं. 1994 मध्ये त्यांनी तेलगू देसम पार्टीत प्रवेश केला. नंतर पुढे समाजवादी पक्षात प्रवेश केला. 2004 साली रामपूरमधून त्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या आणि लोकसभेत पोहोचल्या. 2010 साली कथितरित्या पक्षाविरोधी कारवाई केल्यानं पक्षानं त्यांना बडतर्फ केलं गेलं. त्यामुळं मार्च 2014 मध्ये जयाप्रदा यांनी राष्ट्रीय लोकदलाचा झेंडा हाती घेतला आणि सरतेशेवटी त्या भाजपमध्ये सामील झाल्या.

जयाप्रदा यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तेलगू सिनेमातून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. भूमिकोसम हा त्यांचा पहिला सिनेमा होता. या सिनेमासाठी त्यांना फक्त 10 रुपये मानधन मिळालं होतं. बॉलिवूडमधील अनेक हिट सिनेमात त्यांनी काम केलं आहे. 1979 साली आलेला सरगम, 1984 साली आलेला तोफा, शराबी, कोहराम, आज का अर्जुन, आखरी रास्ता, मक्सद, मवाली, मिलिट्री राज, थानेदार असे त्यांचे अनेक हिट सिनेमे सांगता येतील.