अमिताभ बच्चनमुळे कादर खान यांच्या करिअरला ‘बिग ब्रेक’, पाहा हा Viral Video

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकेकाळी दिवंगत अभिनेते कादर खान यांच्या निधनानंतर अनेकदा अमिताभ बच्चन दोघेही खूप चांगले मित्र होते. दिवंगत अभिनेते कादर खान यांच्या निधनानंतर अनेकदा अमिताभ बच्चन दुःख व्यक्त करत भावूक होतात. परंतु, कादर खान यांचे करिअर संपुष्टात आणण्यात अमिताभ बच्चनच कारणीभूत ठरले.

अमिताभ बच्चन खासदार बनल्यानंतर त्यांना लोक सरजी बोलू लागले होते. कादर खान मात्र अमिताभ यांना सर जी बोलणे पसंत करत नव्हते. ते दोघेही खूप चांगले मित्र होते. मित्राला कसे कोणी असे बोलवणार शेवटी तो खूप जवळचा मित्र आहे मात्र, हीच गोष्ट कादर खान यांना नडली आणि त्यांचे करिअरही संपुष्टात आले.

कादर खान आणि अमिताभ बच्चन यांच्या जोडीने ‘दो और दो पाँच’, ‘मुकद्दर का सिकंदर’ , ‘मिस्टर नटवरलाल’ , ‘सुहाग’, ‘कुली’, ‘शहंशाह’ या सिनेमांमध्ये एकत्र काम केले. अमिताभ यांच्या ‘अमर अकबर अँथनी’ , ‘सत्ते पे सत्ता’ , ‘मिस्टर नटवरलाल’ आणि ‘शराबी’ या सिनेमांचे डायलॉगही त्यांनी लिहिले. पण इतके पुरेसे नव्हते. कादर खान यांना अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक सिनेमा बनवायचा होता. पण याचकाळात ‘कुली’ सिनेमाच्या शूटिंगवेळी अमिताभ गंभीर जखमी झाले ते अनेक महिने रुग्णालयात होते. बरे झाल्यानंतर ते इतर सिनेमांच्या शूटिंगमध्ये बिझी झाले आणि राजकारणात त्यांनी प्रवेश केला. त्यामुळे कादर खान यांचे अमिताभ बच्चनसोबत सिनेमा करण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.

 

 

https://youtu.be/u-pIPrA44bo

 

 

 

त्यावेळी कादर खान रसिकांचे आवडते कलाकार बनले होते. मात्र, करिअरच्या वळणावर अपयश सहन करावे लागले होते. खुद्द कादर खान यांनीच एका मुलाखतीत सांगितले होते. त्यांचा हाच मुलाखतीचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. कादर खान म्हणाले की, एका दाक्षिणात्य निर्मात्याने त्यांना अमिताभ बच्चन यांना सरजी बोलण्याचा सल्ला दिला होता. पण ते तयार झाले नाहीत. कारण ते नेहमीच त्यांना प्रेमाने अमिताभ असे संबोधायचे. जेव्हा त्यांनी निर्मात्यांचा सल्ला ऐकला नाही तर त्यांना सिनेमातून डच्चू देण्यात आला. याच कारणामुळे ‘खुदा गवाह’ चित्रपट हातातून निघून गेला. त्यामुळे कादर खान व अमिताभ बच्चन यांचे रिलेशनशीप खराब झाले होते.

कादर खान यांचे म्हणणे होते की जेव्हापासून अमिताभ बच्चन यांनी राजकारणात पाऊल टाकले तेव्हापासून जवळपास आमच्या नात्यात कटूता आली. ते म्हणाले की, “जेव्हा ते खासदार बनून दिल्लीला गेले तेव्हा मी खूश नव्हतो. कारण राजकारणात माणूस गेला की तो बदलून जातो. जेव्हा ते परत आले तेव्हा ते माझेवाले अमिताभ बच्चन नव्हते. मला या गोष्टीचा खूप वाईट वाटले.”