जेव्हा ‘कॉफी विद करण’मध्ये करीना कपूरनं उडवली होती प्रियंका चोपडाच्या इंग्रजीची खिल्ली ! अभिनेत्रीनं दिलं होतं जोरदार ‘प्रत्युत्तर’ (व्हिडीओ)


पोलिसनामा ऑनलाइन –
करण जोहरचा टॉक शो कॉफी विद करणमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात करीना कपूर आणि प्रियंका चोपडा एकमेकींवर टीका करत दिसत आहे. यात करीना कपूर प्रियंकाच्या इंग्रजीवर टीका करत आहे आणि प्रियंकाही त्याला जोरदार प्रत्युत्तर देताना दिसत आहे.

समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, करण करीनाला म्हणत आहे की, तुला प्रियंकाला एक प्रश्न विचारायचा असेल तर काय विचारशील. यावर तिच्या इंग्रजीची खिल्ली उडवत करीना म्हणते, मला जाणून घ्यायला आवडेल की, तिनं अमेरिकन अॅक्सेंट कुठून शिकला आहे.

व्हिडीओत दिसत आहे की, शोमध्ये काही दिवसांनी प्रियंका चोपडा आल्यानंतर करणनं तिला यावर प्रतिक्रिया विचारली असता प्रियंका म्हणते, तिथूनच शिकले जिथून तिचा बॉयफ्रेंड शिकला आहे. प्रियंका सैफ अली खानबद्दल बोलत आहे.

प्रियंका आणि करीना यांनी डॉन आणि ऐतराज या सिनेमात एकत्र काम केलं आहे. परंतु तेव्हा त्यांच्यात सारं काही ठिक नव्हतं ही गोष्ट खूप कमी जणांना माहिती आहे. दोघींमधल्या कॅटफाईटला तेव्हा सुरुवात झाली होती जेव्हा कॉफी विद करण शोमध्ये जेव्हा करीनाला कॉम्पिटीटर बद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिनं राणी मुखर्जीनं नाव घेतलं. जेव्हा करणनं प्रियंकाचं नाव घेतलं तेव्हा करीना म्हणाली, मला वाटत आपण अॅक्टर्सबद्दल बोलत आहोत. यानंतर दोघींमध्ये कोल्ड वॉर सुरू झालं.

सध्या मात्र दोघींमध्ये सारं काही आलबेल आहे. दोघी कॉफी विद करणच्या 6 व्या सीजनमध्ये जेव्हा त्या एकत्र दिसल्या होत्या तेव्हा दोघींनी एकमेकींचं कौतुक केलं. यावेळी करीना म्हणाली होती प्रियंका जागतील प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक आहे.