जेव्हा कॅटरीना कैफनं ‘अनारकली’ लुकमध्ये ‘ताज महाल’समोर दिली ‘अशी’ पोज ! फोटो झाला ‘व्हायरल’

पोलिसनामा ऑनलाइन –सध्या लॉकडाऊनमध्ये घरात असणारी सर्व कलाकार मंडळी सोशलवर अ‍ॅक्टीव दिसत आहे. फोटो किंवा व्हिडीओ किंवा एखादी पोस्ट शेअर करत ते चाहत्यांशी संपर्क साधताना दिसत आहेत. अलीकडेच अभिनेत्री कॅटरीना कैफ आपल्या एक पोस्टमुळं चर्चेत आली आहे. सध्या तिचा एक फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

कॅटरीना कैफनं तिच्या इंस्टावरून तिचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिचा सिनेमा मेरे ब्रदर की दुल्हन या सिनेमाच्या सेटवरील आहे. या सिनेमात अभिनेता इम्रान खान आणि कॅट प्रमुख भूमिकेत होते. असं म्हटलं जात आहे की, कॅटरीनाचा हा फोटो इश्क रिस्क गाण्याच्या शुटींगदरम्यानचा आहे.

कॅटरीनाच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं अनारकलीचा लुक केला आहे. इश्क रिस्क या गाण्यात तिनं हाच आउटफिट केला होता. तिच्या हातात द्राक्षे आणि डोळ्यावर गॉगल दिसत आहे. खास बात अशी की, तिच्या बॅकग्राऊंडला ताजमहाल दिसत आहे. कॅटचा हा फोटो सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहे.

कॅटरीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायाचं झालं तर लवकरच ती सूर्यवंशी सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली आहे. या सिनेमात ती अक्षय कुमार सोबत दिसणार आहे. रोहित शेट्टीसोबत ती पहिल्यांदाच काम करत आहे.