जेव्हा ‘रामायण’च्या चालू शुटींगमध्ये ‘लक्ष्मण’ सुनील लहरींनी चुकून पकडला साप !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : रामानंद सागर यांची डीडीवरील रामायण ही मालिका संपली आहे. तरीही मालिकेशी संबंधित अनेक किस्से समोर येताना दिसत आहे. अलीकडेच रामायणमधील लक्ष्मण सुनील लहरी यांनी शुटींगचा एक मजेदार किस्सा सांगितला आहे जो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. सुनील लहरी यांनी ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.

यात त्यांनी सांगितलं आहे की, चालू शुटींगमध्ये त्यांनी चुकून साप पकडला होता. परंतु ते जराही घाबरले नाहीत. सुनील लहरी म्हणतात, “राम, लक्ष्मण आणि सीता तिघेही जंगलात चालत असतात. सीन शुट होत होता. मी खुर्ची टाकून बसलो. स्टुडिओच्या मागे जंगलासारखा एरिया होता जिथं आम्ही शुटींग करत होतो. अचानक मला जाणवलं की, काही तरी सरपटत माझ्या अंगावर चढत आहे.

मी हातानं पकडत बाहेर काढलं तर तो साप होता. परंतु तो एक लहान साप होता. मोठा असता तर माहिती नाही काय झालं असतं. त्या भागात असे साप नेहमीच निघत राहतात. सुनील लहरींनी शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like