जेव्हा लता मंगेशकरांनी CID मधील ACP ‘प्रद्युम्न’वर बंदुक रोखली, फोटो व्हायरल !

पोलिसनामा ऑनलाइन –सोनी टीव्हीवरील CID ही मालिका खूप फेमस आहे. या मालिकेतील एसीपी प्रद्युम्न ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेता शिवाजी साटम यांनी अलीकडेच 70 वा वाढदिवस साजरा केला. दिग्गज गायिका लता मंगेशकर यांनी काही जुने आणि खास फोटो शेअर करत साटम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

लता मंगेशकर यांनी साटम आणि सीआयडीच्या टीमसोबत काही फोटो ट्विटरवरून शेअर केले आहेत. एसीपी प्रद्यु्म्न शिवाजी साटम यांना त्यांनी बर्थडे विश केलं आहे. आपल्या पोस्टमध्ये लता यांनी लिहिलं की, “नमस्कार, आज सीआयडी सीरियलमधील एसीपी प्रद्युम्न शिवाजी साटम यांचा वाढदिवस आहे. मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते. पुन्हा एकदा सीआयडी मालिका सुरू होईल ही माझी मनोकामना आहे.” असंही त्या म्हणाल्या आहेत.

एका फोटोत तर लता मंगेशकर शिवाजी साटम यांच्यावर बंदुक ताणून आहेत असं दिसत आहेत. आणखी एक फोटो त्यांनी शेअर केला आहे. ज्यात त्या लिहितात, “सीआयडीच्या टीमसोबत माझा आवडता फोटो.” 21 एप्रिल रोजी शिवाजी साटम यांनी आपला 70 वा वाढदिवस साजरा केला आहे.