सुशांतचा मनाला स्पर्श करणारा व्हिडीओ वेगानं होतोय सोशलवर व्हायरल (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याच्या निधानानंतर अनेकांनी प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केलं आहे. चाहते आणि सेलेब्स अजूनही सुशांतची आठवण काढत आहेत. सध्या सुशांतचे अनेक जुने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच मनाला स्पर्श करणारा त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

https://www.instagram.com/p/CBvOgFrhfiq/?utm_source=ig_embed

समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, सुशांत स्वत: त्याच्या हाातानं भारतीय सैनिकांना जेवण वाढताना दिसत आहे. सुशांतच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत आहे की, त्यावरून स्पष्ट दिसत आहे की, सुशांत किती शांत स्वभावाचा होता.

व्हिडीओत दिसत आहे की, काही सोल्जर्स सुशांतसाठी टाळ्या वाजवत आहेत आणि त्याचं कौतुक करत आहेत. व्हिडीओवरून लक्षात येत आहे की, सुशांत स्टार असल्याचा त्याला कोणताही गर्व नव्हता आणि त्याचा कोणताही दिखावा नव्हता. तो खूप शांत आणि सरळ साधा होता. हा व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होत आहे. सुशांतला हे काम करताना पाहून चाहतांच्या मनात त्याच्याबद्दलचा आदर आणखीच वाढला आहे.