जेव्हा डायरेक्टरनं ऐश्वर्यावर केले होते गंभीर आरोप, ‘बिग बीं’नी दिलं होतं जोरदार ‘प्रत्युत्तर’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार ऐश्वर्या रॉय आणि तिचे सासरे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यातील बाँडिंग साऱ्यांनाच माहिती आहे. नुकताच त्यांचा एक जुना किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. एका डायरेक्टरनं ऐश्वर्यावर गंभीर आरोप केले होते ज्याला बिग बींनी सडेतोड उत्तर दिलं होतं.

2011 साली हिरोईन या सिनेमावरून मोठा वाद झाला होता. यात लिड अॅक्ट्रेस म्हणून ऐश्वर्याच निवड झाली होती. एका न्यूज चॅनलकडून डायरेक्टर मधुर भंडारकर यांना समजलं की ती प्रेग्नटं आहे. सिनेमाची शुटींगही सुरू झाली होती. त्यांनी ऐश्वर्यावर प्रेग्नंट असल्याची माहिती तिनं लवपली असा आरोप केला होता. तिनं हा सिनेमा मध्येच सोडून दिला. यामुळं मधुर यांना खूप नुकसान सहन करावं लागलं होतं.

View this post on Instagram

✨🥰Always 💝✨

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

‘ऐश्वर्यामुळं खूप नुकसान झालं’ : भंडारकर

भंडारकर म्हणाले होते की, “ऐश्वर्याच्या या निर्णयामुळं माझ्यावर संकटांचा पहाड कोसळला होता. मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. मी 8 दिवस ऑफिसलाच गेलो नाही. ज्या लोकांची रोजी रोटी माझ्या सिनेमावर अवलंबून होती त्यांची भीती वाटली होती मला. मी खूप गप्प राहिलो परंतु आता सत्य काय आहे हे सर्वांसमोर आलंच पाहिजे.”

View this post on Instagram

✨🥰Always 💝✨

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

बिग बींनी दिलं होतं प्रत्युत्तर

ऐश्वर्यामुळं नुकसान झाल्याचं भंडारकरांनी म्हटल्यानंतर बिग बींनी ऐश्वर्याची बाजू मांडत म्हटलं होतं की, “जेव्हा सिनेमा साईन केला तेव्हा मधुर भंडारकर यांना माहित होतं ना की तिचं लग्न झालं आहे. तुमचं असं म्हणणं आहे का की, कलाकारांनी लग्न करू नये. मुलं जन्माला घालू नये. मला नाही वाटत कॉन्ट्रॅक्टमध्ये असा कोणता नियम असावा.”

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like