जेव्हा ‘रामायण’मधील ‘मेघनाद’मुळं राजेश खन्नांना वाटू लागलं ‘इनसिक्योर’, ‘हँडसम’ विजय अरोरासाठी पागल होत्या ‘फीमेल’ फॅन्स

पोलिसनामा ऑनलाइन –अभिनेते विजय अरोरा यांनी रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत रावणाचा मुलगा इंद्रजित म्हणजेच मेघनादचा रोल साकारला होता. यातून त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. याशिवाय त्यांनी सिनेमातूनही खूप नाव कमावलं होतं. 80 दशकात त्यांनी अनेक सिनेमात नायकाची भूमिका साकराली आणि बड्या अभिनेत्रींसोबत रोमँस केला आहे.

फिल्म इंस्टिट्युटमध्ये गोल्ड मेडलिस्ट

विजय अरोरा यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलीव्हिजन इंस्टिट्युट ऑफ इंडियातून 1971 साली ग्रॅज्युएशन केलं होतं. जरूरत या सिनेमातून विजय अरोरा यांनी रीना रॉय सोबत बॉलिवूड डेब्यू केला होता. 1972 साली हा सिनेमा आला होता. रीनाचा हा पाहिलाच सिनेमा हाता. यानंतर त्यांनी आशा पारेख सोबत राख और हथकडी सिनेमात काम केलं. यादों की, बारात या सिनेमात ते जीनत अमानसोबत दिसले. या सिनेमातून त्यांना लोकप्रियता मिळाली. लोक त्यांना ओळखू लागले. यानंतर त्यांच्या फीमेल फॅन्समध्ये खूप वाढ झाली.

https://www.instagram.com/p/Bscb55KFq6Q/

राजेश खन्नाला वाटू लागील इनसिक्योरिटी

70 च्या दशकात जेव्हा विजयनं करिअरला सुरुवात केली तेव्हा राजेश खन्ना हिंदी फिल्म इंडस्ट्रीत आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करत होते. असं सांगितलं जातं यादों की बारात या सिनेमानंतर विजयच्या वाढलेल्या लोकप्रियतेनं राजेश खन्ना यांना इनसिक्योर केलं होतं. यानंतर विजय यांनी फागुन, एक मुट्ठी आसमान, इंसाफ, 36 घंटे, रोटी असे अनेक सिनेमे केले.

1986 साली आलेल्या विक्रम और बेताल या मालिकेतून विजय यांनी लहान पडद्यावर करिअरला सुरुवात केली . परंतु त्यांना लोकप्रियता मिळाली ती 1987 साली आलेल्या रामायण या मालिकेतून. यात त्यानी मेघनादची भूमिका साकारली होती. यावेळी ते 43 वर्षांचे होते.