PM मोदी ‘सिरम’मध्ये दाखल होताच आसाराम बापूच्या समर्थकांकडून निदर्शने, तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिरममध्ये दाखल झाल्यानंतर सिरमसमोर आंदोलन करणार्‍या तिघांना पोलिसांनी तातडीनं ताब्यात घेतलं. ते तिघेही युवा सेवा संघाचे आहेत. आसाराम बापुला मुक्त करण्यासाठी त्यांनी निदर्शन केल्याचं सांगण्यात येतं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौर्‍यावर होते. त्यांनी सिरम इन्स्टिटयूटला भेट देवून कोरोनाच्या लशीसंदर्भात आढावा घेतला. दरम्यान, येवा सेवा संघाकडून सिरमसमोर निदर्शन करण्यात आलं. पोलिसांनी निदर्शने करणार्‍या युवा सेवा संघाच्या ऋषीकेश सुहास देवरे, संतोष हिरालाल शेजवाल आणि संतोष देवरे यांना ताब्यात घेतलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून आसाराम बापू जेलमध्ये आहेत. त्यांना मुक्त करण्याच्या मागणीसाठी युवा सेवा संघाकडून निदर्शने करण्यात आली. मात्र, पोलिसांनी तात्काळ तिघांना ताब्यात घेतलं

You might also like