Video : ATM कार्डमुळे तुमचे खातेच होऊ शकते रिकामे, पोलिसांनी दिलेली माहिती सोशल मीडियावर व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  सध्या दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनाकाळात अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. तसेच सर्वसामान्यांकडे पैशांची चणचण भासत आहे. पण कोरोना येवो किंवा कोणतेही मोठं संकट समाजातील गुन्हेगारी काही कमी होणार नाही. पैसे काढण्यासाठी लाखो लोकांकडून दररोज एटीएमचा वापर केला जाताे. अशात अनेक ठिकाणी एटीएमचा दुरुपयोग होत असून, त्यातून लोकांच्या खात्यातील पैसे लंपास केले जात आहेत. याबाबत एका पोलीस अधिका-याने एटीएमच्या माध्यमातून कशा प्रकारे गंडा घातला जातो हे समजावून सांगितले (police-officer-show-how-anyone-can-done-fraud-your-atm-clone-video-goes-viral) आहे. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दयानंद कांबळे असे या पोलीस अधिका-याचे नाव आहे. त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, डुप्लिकेट पार्ट्स लावून कशा पद्धतीने एटीएममधून पैसे बाहेर काढले जातात. इतकेच नाही, तर कॅमेरा लावून तुमचा पासवर्डही चोरी केला जाऊ शकतो, हे त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

You might also like