‘देसी गर्ल’ प्रियंकानं शेअर केलं बेडरूम सिक्रेट ! म्हणाली- ‘रोज सकाळी निक…’

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) आपल्या स्टाईल आणि फॅशनसाठी कायमच चर्चेत असते. तिचे अनेक आऊफिट्स आजवर चर्चेचा विषय ठरले आहेत. प्रियंका चोपडा सध्या पती निक जोनास (Nick Jonas) सोबत मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहे. आज ती ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियंकानं बेडरूम सिक्रेट शेअर केलं होतं.

असं काय आहे ज्याच्याशिवाय निक राहू शकत नाही याचा खुलासा प्रियंकानं केला आहे. एका मुलाखतीत प्रियंकानं सांगिलतं की, निक जेव्हा सकाळी उठतो तेव्हा सर्वात आधी त्याला माझा चेहरा पाहायचा असतो. नंतर मी त्याला म्हणते की, एक मिनिट थांब जरा मी थोडं मॉश्चरायजर आणि मस्करा लावते. झोपेतून उठल्यानंतर चेहरा थोडा डल वाटतो. परंतु निकला मात्र तोच चेहरा सुंदर आणि स्वीट वाटतो. सकाळी उठल्यानंतर पतीनं आधी आपला चेहरा पहावा अशी अनेकांची इच्छा असते.

पुढे प्रियंकानं सांगितलं होतं की, निक मला म्हणतो तुला असंच पहायला जास्त आवडतं. एका पती-पत्नीमध्ये असंच नातं असलं पाहिजे. प्रत्येक पत्नीला असाच काहीसा नवरा हवा असतो. त्याला मला न्याहाळायला खूप आवडतं. आम्ही दोघं एकमेकांना न बघता एक किंवा दीड आठवड्यांपेक्षा जास्त दिवस राहू शकत नाही असंही ती म्हणाली होती.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती व्हाईट टायगर सिनेमात दिसणार आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव असेल. अशीही माहिती आहे की, पीसी(प्रियंका) संजय लीला भन्साळींच्या बैजू बावरा या आगामी सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अॅमेझॉन स्टुडिओजच्या शीला या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात ती मां शीला आनंदची भूमिका साकारणार आहे. असंही म्हटलं जात आहे की, हॉलिवूडच्या मॅट्रीक्स 4 या सिनेमातही ती काम करण्याची शक्यता आहे. तिच्याकडे वी कॅन बी हिरोज (We Can Be Heroes) हा सिनेमाही आहे.