जेव्हा रकुल प्रीत सिंहनं पहिल्यांदा घातली ‘बिकिनी’ ! ‘अशी’ होती आई-वडिलांची ‘रिअ‍ॅक्शन’


पोलिसनामा ऑनलाइन –
बॉलिवूड स्टार रकुल प्रती सिंह हिनं बॉलिवूडपासून तर साऊथपर्यंत आपली ओळख तयार केली आहे. आज आपण रकुलच्या फर्स्ट टाईम बिकिनी घालण्याच्या अनुभवाबद्दल जाणून घेणार आहोत. एका मुलाखतीत तिनं याबाबत खुलासा केला आहे. आईवडिलांची काय रिअॅक्शन होती हेही तिनं सांगितलं आहे.

अलीकडेच एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत बोलताना रकुल प्रीत सिंह हिनं तिच्या बिकिनीच्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. या मुलाखतीत तिचे आई वडिलही उपस्थित होते. रकुल म्हणाली, “मी माझ्या आईला म्हणाले होते की, मिस इंडियासाठी मला बिकिनी घालावी लागेल. यावर आई म्हणायची की, तू यासाठी तयार रहा. यात काय एवढं. इतर मुलींचे पालक तिला बिकिनी घालण्यासाठी सपोर्ट करत नाही. परंतु माझ्या पालकांनी मला कायमच सपोर्ट केला आहे.” ती सांगते की वडिलांनीही तिला नेहमी सांगितलं की, स्वत:मध्ये आत्मविश्वास कसा आणावा.

या मुलाखतीत तिच्यासोबत तिची आईदेखील होती. त्यांनी सांगितलं की, “मीच तिला मिस इंडियामध्ये भाग घेण्यासाठी तिला तयार केलं. मला वाटायचं की तिनं पूर्ण आत्मविश्वासानं यात उतरावं. मला माहिती होतं की, ती करू शकेल.”

रकुल प्रीतनं 2011 मध्ये मिस इंडिया पेजेंटमध्ये भाग घेतला होता. यात तिनं पाचवा क्रमांक मिळवला होता.

रकुलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रकुल लवकरच इंडियन 2 या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती कमल हासनसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अर्जुन कपूरसोबतही एका सिनेमात काम करताना दिसेल.