‘प्रायव्हेट’ जेट, ‘अलिशान’ हॉटेल खरेदी करण्याची इच्छा होती रियाची, अभिनेत्रीनं स्वतः सांगितली होती संपुर्ण यादी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती चर्चेत आहे. सुशांतचे वडील केके सिंह यांनी अभिनेत्रीसह ६ जणांविरूद्ध एफआयआर नोंदवली आहे आणि आत्महत्या करण्यास भाग पाडणे यासारखे अनेक गंभीर आरोप केले आहेत.

जुना व्हिडिओ व्हायरल
आता अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती आपल्याला खरेदी करायच्या वस्तूंची यादी सांगत आहे. या व्हिडिओमध्ये रिया म्हणते, ‘मला एक बेट खरेदी करायचे आहे, खासगी विमान आणि हॉटेल खरेदी करायचे आहे. मला हॉटेल्स आवडतात.’ रिया आपली इच्छा सांगून हसू लागते. तिचा हा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रियाची चौकशी चालू आहे
सुशांतच्या आत्महत्येच्या एक महिन्यानंतर त्याचे वडील केके सिंह यांनी रियासह इंद्रजित चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि श्रुती मोदी या ६ जणांविरूद्ध एफआयआर दाखल केली. सुशांतच्या वडिलांचा आरोप आहे की, रियाने त्यांच्या मुलाच्या खात्यातून १५ कोटी रुपये ट्रान्सफर केले. ते म्हणाले की, कट रचून रियाने त्यांच्या मुलासह ओळख वाढवली, जेणेकरून ती त्याच्या संपर्कांचा वापर करून बॉलिवूडमध्ये आपली जागा करू शकेल.

श्रुती मोदीने केला होता हा खुलासा
माजी व्यवसाय व्यवस्थापक श्रुती मोदीने चौकशीत ईडीला सांगितले होते की, सुशांतच्या जीवनाशी संबंधित सर्व निर्णय रिया चक्रवर्ती घेत होती. ती म्हणाली की, सुशांतच्या आयुष्यातील वैयक्तिक, व्यावसायिक आणि आर्थिक संबंधित सर्व निर्णय रिया घेत होती. श्रुतीने सुशांतसह त्यावेळी काम करण्यास सुरु केले होते, जेव्हा तो रियाला भेटला होता आणि दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली होती. श्रुतीने सांगितले की, फेब्रुवारी २०२० पासून तिचा सुशांतशी संपर्क नव्हता. मात्र सुशांतच्या खात्याशी संबंधित कोणत्याही अवैध व्यवहाराची माहिती नाही, असेही श्रुतीने म्हटले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like