Video : जेव्हा रिया चक्रवर्तीनं अर्णब गोस्वामी यांना आपल्या आयडलबद्दल सांगितलं होतं, आता समोर आला व्हिडीओ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सर्वांची नजर रिया चक्रवर्तीवर आहे. त्याच्या निधनानंतर रियावर निशाणा साधला जात आहे. सीबीआय, ईडी तिची सतत चौकशी करत आहे. यादरम्यान रियाशी संबंधित अनेक गोष्टी आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रियाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करून लोक तिला जोरदार ट्रोल करत आहेत.

अलीकडेच तिचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पत्रकार अर्णब गोस्वामीचा उल्लेख करताना दिसत आहे आणि त्याला आपला आयडल सांगत आहे. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत विवेक ओबेरॉय देखील दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रिया खुर्चीवर बसलेली आहे आणि खूप घाबरली आहे. यावेळी ती बोलते ‘एकला चलो रे’, त्यानंतर ती म्हणते, गायत्री, तुला हे करावे लागेल, तुझ्या जागी ‘आरगो’ असता तर त्यानेही हेच केले असते. तू हे करू शकते, तू हे ‘आरगो’ साठी करशील. तेव्हा विवेक तिथे येतो आणि विचारतो ‘आर्गो ???’ तेव्हा रिया म्हणते ‘अर्नब गोस्वामी सर तो माझा आयडल आहे’.

 

 

 

https://www.instagram.com/p/CEWDf9gp0O8/?utm_source=ig_embed

 

 

 

हा व्हिडिओ रियाच्या ‘बँक चोर’ चित्रपटाचा आहे. या चित्रपटात रियाने एका पत्रकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिच्यासोबत मुख्य भूमिकेत विवेक ओबेरॉय आणि रितेश देशमुख होते. रियाचे आतापर्यंत अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यात तिला ट्रोल केले जात आहे. अलीकडेच तिचे काही व्हिडिओ समोर आले होते, ज्यात ती महेश भट्टसोबत मीडियाला मुलाखत देताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रिया प्रेमाविषयी बोलत होती.

 

 

 

https://www.instagram.com/p/CEQ9T8HBDKx/?utm_source=ig_embed