‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत ‘झेंगाट’ असल्याच्या चर्चांनी भडकला होतासचिन तेंडुलकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार शिल्पा शिरोडकरनं बॉलिवूडमधील एक काळ खूप गाजवला. नव्वदच्या दशकात तिनं अनेक सिनेमात काम केलं. 2000 साली सिनेमांपासून दूर झालेली शिल्पा 13 वर्षांनी पुन्हा अभिनयाकडं वळली. नुकताच शिल्पाचा वाढदिवस झाला. त्यामुळं ती पुन्हा चर्चेत आली आहे. 20 नोव्हेंबरला तिनं आपला वाढदिवस साजरा केला. शिल्पा आपल्या अ‍ॅक्टींगपेक्षा बोल्ड सीन्समळंच जास्त चर्चेत राहिली आहे. शिल्पामध्ये आता एवढा बदल झाला आहे की ती ओळखू देखील येत नाही.

आज आपण शिल्पाविषयी असा किस्सा जाणून घेणार आहोत जो क्वचितच कोणाला माहिती असेल आणि तो किस्सा मास्टर ब्लास्टर सचित तेंडुलकरशी निगडीत आहे. एक काळ असा होता की, शिल्पा आणि सचिनच्या अफेअरची खूप चर्चा झाली. यावेळी शिल्पानं शांत राहणं पसंत केलं परंतु मीडियात दोघांबद्दल जेव्हा बोलले जाऊ लागले तेव्हा त्यांच्या अफेअरच्या चर्चांनी सचिन मात्र प्रचंड चिडला होता. आपण शिल्पाला कधीच भेटलो नाही असं त्यांनी माध्यमांना सांगितलं होतं.

View this post on Instagram

Always good to be in Kerala.

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on

एका मुलाखतीत सचिनला विचारण्यात आलं होतं की, तुझ्याविषयीच्या कोणत्या विचित्र अफवा तू ऐकल्या आहेस ? यावर उत्तर देताना तो म्हणाला, “माझ्याविषयी मी वाचलेली सगळ्यात विचित्र अफवा म्हणजे माझे आणि शिल्पा शिरोडकरचे अफेअर आहे. आम्ही तर एकमेकांना ओळखतही नाही. तर अफेअरचा प्रश्न येतोच कुठे.”

सचिननं जेव्हा आपली प्रतिक्रिया दिली तेव्हा कुठे त्याच्या आणि शिल्पाच्या अफेअरच्या चर्चांनी पूर्णविराम घेतला. यानंतर काही वर्षांनी सचिन अंजलीसोबत विवाहबद्ध झाला तर शिल्पाही युकेतील अपरेश रंजीत या बँकरसोबत लग्नबंधनात अडकली.

शिल्पाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर 90 च्या दशकात तिनं भ्रष्टाचार, योद्धा, हम, आँखे, गोपी किशन यांसारख्या अनेक सिनेमात काम केलं. 2000 सालानंतर शिल्पा सिनेमांपासून दूर झाली. 13 वर्षांनी ती पुन्हा अ‍ॅक्टींगकडे वळाली. एक मुठ्ठी आसमान या मालिकेत तिनं प्रमुख भूमिका साकारली होती. यानंतर गेल्याच वर्षी आलेल्या सिलसिला प्यार का या मालिकेतही शिल्पानं काम केलं.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like