‘सैफ-अमृता’ शेवटचं कधी भेटले ? सारा अली खाननं केला ‘गौप्यस्फोट’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सारा अली खान मागील काही दिवसापासून चांगलीच चर्चेत आली आहे. साराचा रिलीज झालेला सिनेमा लव्ह आज काल हा जास्त काळ बॉक्स ऑफिसवर चालला नाही. पण आर्यनच्या ऑफ आणि ऑनस्क्रीन केमिस्ट्रीची चर्चा मात्र जोरदार झाली. काही कार्यक्रमाच्या वेळेस साराला चाहत्त्यांकडून भाभी अशी हाक मारण्यात आली.

साराने एका मुलाखतीच्या वेळेस तिच्या आई वडिलांविषयी खुलासा केला आहे. सैफ अली खान आणी अमृता सिंग यांनी १५ वर्षांपूर्वीच घटस्फोट घेतला. दोन्ही मुलांना अमृता यांनीच मोठ केलं आहे. तरी ही  सैफ दोन्ही मुलांच्या फार जवळ आहे. एका शो दरम्यान सारा ने तिच्या आई वडिलांचं नातं कसं आहे हे सांगितले आहे, ती म्हणाली ‘मला कॉलेजला सोडायला माझे आई-बाबा आले होते. त्या काळात मी आणि बाबा एकत्र रात्रीचं जेवण करायचो. तेव्हा आमच्या डोक्यात आलं की आईलाही बोलावून घेतलं पाहिजे. आम्ही लगेच आईला फोन लावला. तीही लगेच आली.’ तो  काळ  फार चांगला होता. सारा २०१४ मध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीत शिकायला गेली होती.

 

View this post on Instagram

 

Mirror mirror- are you mommy or a reflection? 👥 The only difference between us- is I always want her attention 🙇🏻‍♀️🙋🏻‍♀️ She on the other hand is full of love, hugs and affection 👩‍👧❤️🤗 And undivided time and energy I sometimes forget to mention 🙏🏻💪🏻 My anchor, my inspiration, the magician that takes away all tension🧚🏻‍♀️🤱🏻 She has cures for mood swings, hair-fall, dry skin and water retention 💁🏻‍♀️👯‍♂️ Her versatility, commitment, patience, and selflessness is beyond my comprehension 🤷‍♀️🙀😻 With her around no sadness lasts, no fear persists there can’t be much apprehension- Basically without contention, no need to even mention, mommy is best in every dimension. 🌍 🗺 🌌 #amritakibeti #sarakishayari #gotitfrommymama #likemotherlikedaughter #mommyno1

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on Dec 28, 2019 at 10:31pm PST

 

आम्ही एकमेकांसोबत फार चांगला वेळ घालवला. ते मला कॉलेजमध्ये सोडून परत भारतात आले. त्यावेळी आई माझी झोपायची खोली आवरत होती तर बाबा लँपचा बल्ब लावत होते. या फार अविस्मरणीय आठवणी आहेत ज्या नेहमीच माझ्यासोबत राहतील असं सारा अली खान म्हणाली.