जेव्हा सैफ अली खाननं सर्वांसमोर मागितली होती अमृता सिंहची ‘माफी’, फीमेल फॅनच्या नादात खाल्ला होता ‘मार’ !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार सैफ अली खानचा एक जुना किस्सा सध्या व्हायरल होताना दिसत आहे. हा किस्सा 1994 मध्ये रिलीज झालेल्या मैं खिलाडी तू अनाडी दरम्यानचा आहे. एका फीमेल फॅनमुळं एवढा राडा झाला होता की, सैफनं कॅमेऱ्यासमोर अमृता सिंहची माफी मागितली होती.

https://www.instagram.com/p/B9rdV1JBjnc/

एका इंग्रजी वृत्तानुसार, 1994 मध्ये रिलीज झालेल्या मैं खिलाडी तू अनाडी या सिनेमाच्या प्रीमीयरनंतर सैफ काही मित्रांसोबत नाईट क्लबमध्ये गेला होता. इथं तो काही चाहत्यांना भेटला होता. यावेळी एका फीमेल फॅननं त्याला अप्रोच करत डान्ससाठी विचारलं. त्यावर सैफ राजी झाला आणि त्यांनी डान्स केला. परंतु अडचण अशी झाली की, मुलीच्या बॉयफ्रेंडनं सैफसोबत वाद घातला होता. त्यानं सैफला धमकी तर दिलीच परंतु एक ठोसाही लगावला.

नंतर मात्र सैफनंही हा विषय पुढे वाढवला नाही. सैफला जाणीव झाली की, अमृता खूप अपसेटअसेल. त्यामुळं त्यानं कॅमेऱ्यासमोर अमृता सिंहची माफी मागितली होती. यावरून सिद्ध होतं की, सैफ किती इमानदार आहे.

सैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तान्हाजी नंतर आता तो जवानी जानेमन सिनेमात दिसला होता. 31 जानेवारी 2020 रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात अलाया फर्निचरवाला आणि तब्बू प्रमुख भूमितकेत होत्या.