Throwback : गर्लफ्रेंडचे वडिल अचानक आल्यानं कपाटात लपला ‘भाईजान’ सलामान ! झाली ‘अशी’ हालत

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सलमान खान आपल्या गर्लफ्रेंडमुळंही अनेकदा चर्चेत राहिला आहे. सलमान खाननं कॅटरीना कैफ, ऐश्वर्या रॉय, संगीता बिजलानी आणि सोमी खान यांसारख्या अनेक एक्ट्रेसला डेट केलं आहे. सलमान खाननं रिअ‍ॅलिटी  शोमध्ये बोलताना सांगितलं होतं की, तो एकदा गर्लफ्रेंडच्या कपाटात लपला होता.

दस का दम या टीव्ही शोमध्ये श्रद्ध कपूर आणि राजकुमार राव सोबत आले होते. यावेळी त्यांनी खासगी आयुष्यातील काही खुलासे केले. यावेळी सलमान खाननंही सांगितलं की, तो त्याच्या एक्स गर्लफ्रेंडच्या घरी होता आणि एकदा कपाटात लपला होता.

सलमान खाननं सांगितल्यानुसार, तो गर्लफ्रेंडच्या घरी असताना तिचे वडिल अचानक घरी आले होते. यावेळी त्याच्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता. त्यामुळं तो एका कपाटात लपला. सलमान खानला कपटातली धूळ काही सहन झाली नाही. तो जोराजोरात शिंकू लागला.

सलमाननं सांगितलं की, गर्लफ्रेंडच्या वडिलांनी त्याला पकडलं होतं. त्याचं नशीब चांगलं होतं की, त्यांना तो आवडला होता. त्यामुळं तो वाचला होता. इतकेच नाही तर सलमान खाननं सांगितलं की त्याला त्याची टीचरदेखील आवडत होती. तो त्यांच्यासोबत फ्लर्टही करत असे.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे इंडियाज मोस्ट वॉन्टेड या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभू देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.