‘शाळा-कॉलेज’ केव्हापासून सुरु होणार ? सरकारने दिली ‘ही’ माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जसं जसं 14 एप्रिलची तारीख जवळ येत आहे तसं तशी विविध चर्चा सुरु झाली आहे. सर्वजण लॉकडाऊन कधी संपेल यांची वाट पाहत आहे. परंतु लोकांच्या मनात भीती आहे की लॉकडाऊन वाढवला जाणार तर नाही. या दरम्यान सर्वात जास्त प्रश्न विचारला जात आहे तो म्हणजे शाळा आणि कॉलेज कधी सुरु होणार.

देशभरातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा हाच प्रश्न आहे. नव्या शैक्षणिक सत्राची वेळ निघून जात आहे. बोर्डसह महत्वाच्या परिक्षा, अॅडमिशन प्रक्रिया थांबल्या आहेत. हे सर्व तेव्हाच सुरु होतील जेव्हा शाळा आणि कॉलेज सुरु होतील. अनेक लोक अंदाज व्यक्त करत आहे की 15 एप्रिलपासून शाळा आणि कॉलेज सुरु होतील.

आता या प्रश्नावर सरकारकडून उत्तर देण्यात आले आहे. केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी या लोकांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले. ते म्हणाले, विद्यार्थी आणि शिक्षकांची सुरक्षा सरकारसाठी महत्वाची आहे. या देशात जवळपास 34 कोटी विद्यार्थी आहेत. हा आकडा अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. हे विद्यार्थी आमची सर्वात मोठी संपत्ती आहे.

त्यामुळे अशा वेळी हा निर्णय घेणे कठीण आहे की लॉकडाऊन उठवल्यानंतर शाळा – कॉलेज सुरु केले जातील किंवा नाही. सरकारने निर्णय घेतला आहे की 14 एप्रिला परिस्थिती पाहिली जाईल. त्याआधारे निर्णय घेण्यात येईल की शाळा कॉलेज सुरु करायचे की काही काळासाठी बंद ठेवायचे.
यासह रमेश पोखरियाल निशंक यांनी आश्वासन दिले आहे की जर 14 एप्रिलनंतर शाळा कॉलेज बंद राहतील तर यानंतर मंत्रालय निश्चित करेल की याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like