30 वर्षापूर्वीच पवारांना लागली होती चीनच्या संकटाची ‘कुणकुण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखती दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संरक्षणमंत्री असताना चीनचा केलेला दौरा कसा घडला याचे स्पष्टीकरण देत चीन संकटाची पंचवीस-तीस वर्षांपूर्वीच कुणकुण लागली असल्याचे स्पष्ट केले.

मुलाखती दरम्यान संजय राऊत यांनी संरक्षणमंत्री असताना चीनचा दौरा कसा घडला या संदर्भात विचारले असता ते म्हणाले की, मी संरक्षणमंत्री असताना चीनला गेलो होतो. त्यावेळी डिफेन्स सेक्रेटरी व्होरा हेही सोबत होते. आपले सैन्य हिमालयीन बॉर्डवर तैनात होते. चीनचेही सैन्य होते. हिमालयीन बॉर्डरवर सैन्य ठेवणे अत्यंत खर्चिक होते. हवामानाच्या दृष्टीने जवानांसाठी त्रासदायक होते. बर्फ वगैरे नैसर्गिक बाबींचा विचार करता ते कठीणच होते. या पार्श्वभूमीवर दोन्ही दोशांनी सात दिवसांच्या चर्चेत सैन्य मागे घेण्यावर एकमत केले. त्या कराराचा ड्राफ्ट तयार केल्यानंतर तो पंतप्रधान नरसिंह राव यांच्याकडे पाठवला. त्यांनी मसुद्याला मान्यता दिली.

यानंतर चीनच्या संक्षणमंत्र्यांनी त्यांच्या पंतप्रधानांना ड्राफ्ट दाखवण्यासाठी तुम्ही सोबत चला असे म्हटले. पंतप्रधान विश्रांतीला एके ठिकाणी गेले आहेत, असे त्यांनी सांगितले पण कुठे गेले ही जागा सांगितली नाही. सकाळी 7 वाजता तयार रहा अशा सूचना देण्यात आल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 ला डिफेन्सच्या विमानात बसलो. जाईपर्यंत त्यांनी कुठे चाललोय हे सांगितले नाही. तीन तासांनी विमान एका ठिकाणी लँड झाल. तो सागरी किनाऱ्याचा प्रदेश होता. तिथे अजिबात लोकसंख्या नव्हती. ज्या ठिकाणी विमान लँड झाले तिथे चांगले निवास्थान होते.

शेवटी मी विचारले कुठे आलो आहोत आपण ? त्यावर चीनी अधिकाऱ्यांनी सांगितले की, कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिट ब्युरोचे जे मेंबर आहेत त्यांच्यासाठी विश्रांतीसाठी हा सगळा परिसर आहे. इथे बाकी लोकसंख्या नाही. याच ठिकाणी पंतप्रधान होते. साधारण: 11 च्या दरम्यान हे सगळे उरकले. नंतर त्यांनी आम्हाला 1 वाजता जेवायला बोलावले होते. 1 वाजेपर्यंतचा वेळ कसा घालवायचा असा विचार करत असताना पंतप्रधानांनी सुचवलं लेट्स वॉक, असे शरद पवार यांनी सांगितले.

हा किस्सा सांगताना पवार पुढे म्हणाले, समुद्र किनारी आपण चालूया, छान सागरी किनारा आहे, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे असे मनात म्हटले. यानिमित्त त्यांची बोलता येईल. मग आम्ही त्या किनाऱ्यावर चालत होतो, तास-सव्वा तास मी अनेक प्रश्न त्यांना विचारत होतो, तेव्हा त्यांनी मला सांगितले की, माझे सगळे टार्गेट अमेरिका आणि जपान आहे. ही 30 वर्षापुर्वीची गोष्ट आहे, असे सांगताना पवार म्हणाले, चीनला जगाची आर्थिक महासत्ता बनायची आहे, असे चीनचे पंतप्रधान वारंवार सांगत होते. अमेरिकेच्या तोडीस तोड चीन उभा राहू शकतो, चीन अमेरिकेच्या पुढे जाऊ शकतो हे मला दाखवायचे आहे, असे ते त्यावेळी म्हणत होते.

ही चर्चा झाल्यावर मी सहज त्यांना विचारले, तुमच्या शेजारी देशांबद्दल काय धोर राहणार ? तर तर ते हसले आणि म्हणाले, आमचं टार्गेट अमेरिका आणि जपान आहे. शेजारी राष्ट्रांचा तूर्त आम्ही विचार करत नाही. बघू पाच-पंचवीस वर्षांनी विचार करु. हे एकताच उद्या भारतासमोर संकट आले तर ते आज नाही तर 25-30 वर्षांनी येईल असे माझ्या डोक्यात आले होते, असे शरद पवार यांनी मुलाखती दरम्यान सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like