16 वर्षांचा असताना ‘सिंगर’ सोनू निगमनं गायलं होतं ‘महाभारत’चं टायटल साँग ! व्हायरल होतोय 31 वर्षांपूर्वीचा जुना ‘व्हिडीओ’

पोलिसनामा ऑनलाइन –सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात अनेक स्टार्सचे जुने फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत जे व्हायरल होताना दिसले. अशात आता बॉलिवूड सिंगर सोन निगम याचेही खूप जुने आणि इंट्रेस्टिंग व्हिडीओ समोर आले आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एक व्हिडीओ असा आहे ज्यानं खास साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. खुद्द सोनूनं हे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

व्हिडीओद्दल बोलायचं झालं तर असं सांगितलं जात आहे की, हा व्हिडीओ जवळपास 31 वर्षांपूर्वीचा आहे. यात दिसत आहे की, अवघ्या 16 वर्षांचा सोनू आपरल्या मधुर आवाजानं साऱ्यांना इम्प्रेस करत आहे. 1989 सालचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत दिसत आहे की, सोनू आधारशिला अवॉर्ड फंक्शनमध्ये महाभारतचं टायटल ट्रॅक गात आहे.

सोनूनं व्हिडीओ शेअर करताना खास कॅप्शनही दिलं आहे. सोनू म्हणतो, “तालकटोरा इंदोर स्टेडियममध्ये गाणं गातानाचा जुना व्हिडीओ. जिथं मी महाभारतचा टायटल ट्रॅक गायला होता. जो पूर्ण पणे पाठ केला होता. त्याकाळी युट्युबसारखा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नव्हता.”

सोनूचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होताना दिसत. यासोबतच त्याचे आणखीही काही व्हिडीओ समोर आले आहेत जे जुने आहेत आणि तो त्यात सादरीकरण करत आहे.