दारुच्या नशेत तापसी पन्नूने केले असे काही , ज्यामुळे तिला सांभाळणे विकी कौशलला झाले कठीण

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – दक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू हीने आपल्या अभिनयाने सर्वांचे मन जिंकले आहे. अनेक चित्रपटांमध्ये तिने दर्जेदार भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर तिने हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. तिच्या कामाचे कौतुक प्रेक्षक नेहमीच करतात. अचानक तिने असे काय केले जेणेकरुन अभिनेता विकी कौशल याला तिला सांभाळणे झाले कठीण…जाणून घेऊया

‘मनमर्जिया’ चित्रपटाच्या शुटिंगच्या दरम्यान एक खुलासा विकी ने केला आहे. या चित्रपटाचे शुटिंग संपल्यानंतर पार्टित काय घडले याबद्दल तापसीने सांगितले की, शुटिंगनंतर पार्टीचे आयोजन करण्यात आले यामध्ये काय घडले ते मी अजून विसरु शकत नाही. या पार्टीमध्ये मी खुप दारु पिले होते. आणि माझ्यासोबत विकी देखील खुप पिला होता. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो त्या हॉटेलमध्ये गार्डन होते. त्या गार्डनमध्ये आम्ही दोघे अशरक्षः लोळत होतो. एवढेच नाही तर मला रुम मध्ये जायचे नाही मी इथेच झोपणार असा हट्ट मी केला होता.

विकी म्हणाला, आम्ही त्याच हॉटेलमध्ये राहत होतो. त्यामुळे आम्ही रोज जेवल्यानंतर फिरायला बाहेर येत होतो. पण पार्टिमध्ये दारुच्या नशेत तापसीला गार्डनमध्ये झोपायचे होते. तिला मी रुममध्ये नेण्यासाठी खुप प्रयत्न केले. पण ती खुप हट्ट करत होती हा किस्सा मी कधीच विसरु शकत नाही.