‘या’ पाच देशांच्या संसदेवर हि झाले होते भारता प्रमाणे दहशतवादी हल्ले 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- भारताच्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असताना १३ डिसेंबर २००१ रोजी दहशतवादी संघटने हल्ला करण्यात आला होता. पांढऱ्या रंगाच्या गाडीतून आलेल्या पाच दहशतवाद्यांनी संसद भवनावर हल्ला चढवला आणि एकच गोंधळ माजवला. त्या दहशतवादी हल्ल्यात संसदेतील शिपाई आणि पोलीस कर्मचारी असे एकत्रित ९ लोक शहीद झाले होते.

तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी संसदेत हजेरी लावून आपल्या सरकारी निवासस्थानाकडे निघाले होते. तर विरोधी पक्ष नेत्या सोनिया गांधी ह्याही लोकसभेच्या सभागृहातून बाहेर पडून आपल्या घरी निघाल्या होत्या. तर तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्या सहित काही मंत्री आणि २०० पेक्षा अधिक खासदार संसद भावनाच्या आत होते. पाच दहशतवाद्यांनी हल्ला चढवला आणि क्षणार्धात संसद भवनाच्या परिसरात रक्ताचा सडा पडला. या घटनेला आज १७ वर्षे पूर्ण झाली परंतु त्या घटनेच्या स्मृती आज हि लोक मनामध्ये बाळगून आहेत. तसेच जगाच्या पाठीवर भारता प्रमाणे अनेक देश आहेत त्यांच्याही संसद भवनावर हल्ला झाला आहे.

इराण संसदेवरील हल्‍ला २०१७
७ जून २०१७ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात इराणच्या संसद परिसरात १२ लोकांचा मृत्यू झाला. या हल्यात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या ६ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. संसद परिसरात आलेल्या सात दहशतवाद्यांनी आपल्या बंदुकांनी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षणांना लक्ष केले आणि  एकच गलका माजवला या हल्ल्यातील सर्व दहशतवादी जागीच मारले गेले.

ब्रिटन संसदेत घुसखोरी करणार्‍या दहशतवाद्याचा खात्मा २०१७
मार्च २०१७ मध्ये ब्रिटन संसदेच्‍या बाहेर दहशतवादी हल्ला चढवून लोकांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला. फुटपाथवरील एका व्यक्तीला या दहशतवाद्याने गोळीबारात ठार केले. संसद भवनात या व्यक्तीने प्रवेश करताच सुरक्षा रक्षकांनी त्याला जागीच ठार केले आणि मोठा अनर्थ टाळला.

ट्युनिशियामध्ये खासदार ओलीस २०१५
ट्यूनीशिया संसदेवर मार्च २०१५ साली दहशतवादी हल्‍ला चढवून खासदारांना ओलीस ठेवण्यात आले. संसद परिसरात दहशतवाद्यांनी हल्ला चढवून गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज होताच सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांनवर हल्ला चढवला. या हल्ल्यात तीन लोक मारले गेले. परंतु चकमक सुरु असतानाच संसद परिसर रिकामा करण्यास सुरक्षा रक्षकांना यश आले.

अफगाणिस्‍तान संसदेवरील हल्‍ला २०१५
जून २०१५ साली अफगाणिस्तानच्या संसदेवर दहशतवाद्यांकडून  हल्ला चढवला गेला. सलग ९ स्फोट घडवून या हल्ल्यात अफगाणिस्तान संसद भवनाचा तळमजला उडवून देण्यात आला. ६ लोकांनी या हल्ल्यात आपला प्राण गमावला होता. तर अफगाणिस्तानच्या सुरक्षा रक्षकांनी सात दहशतवादी या हल्ल्यात ठार केले होते.  तालिबान दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती तर या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या संसदेचे काही खासदारही जखमी झाले होते.

सोमालिया  संसदेवरील हल्ला २०१४
२०१४च्या मे महिन्यात सोमालिया संसदेवर झालेला हल्ला हा त्या देशाच्या इतिहासातील कला दिवस मानला गेला. या हल्ल्यात १० लोकांचा मृत्यू झाला होता. सोमालियाची राजधानी मोगादिशू मध्ये दहशतवादी शिरल्याची बातमी शहरभर वाऱ्या सारखी पसरली आणि लोकांनमध्ये घबराहट पसरली. हल्ला झाला त्यावेळी संसदेचे अधिवेशन सुरु होते. तर हा हल्ला अल शबाब या दहशतवादी संघटने कडून करण्यात आला होता.