आंदोलन थांबल्यास आरक्षण देण्यास सरकार तयार

मुंबई :पाेलीसनामा ऑनलाईन

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी चालू झालेल्या आंदोलनाला लागलेले हिंसक वळण थांबले पाहिजे, यातून राज्याचेच नुकसान होत आहे असे मुख्यमंत्र्यांना वाटते असे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांनी सांगितले. आंदोलन थांबल्यास आरक्षण द्यायला सराकार तयार असल्याचेही राणे यांनी सांगितले.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e2e9c14e-9188-11e8-8e4b-7d286f266e89′]

मराठा समाजास आरक्षण मिळावे याकरता मुख्यमंत्री फडणवीस यांची मी भेट घेतली. येत्या दोन दिवसांत मराठा नेते आणि मुख्यमंत्री यांची भेट मी घडवून आणीन, आरक्षणाचा तिढा सोडवण्यासही मदत करीन असे राणे यांनी पत्रकारांना सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार सक्षम आहे आणि सरकारची भूमिका सकारात्मक आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चाही झाली आहे. मुख्यमंत्री अनुकूल असून उग्र आणि हिंसक आंदोलने थांबली पाहिजेत असे राणे म्हणाले.

कोणतीही राजकीय प्रतिक्रिया देण्यास तसेच मुख्यमंत्री बदलाबाबत भाष्य करण्यास राणे यांनी पत्रकार परिषदेत नकार दिला. सरकार आरक्षण देण्यास अनुकूल आहे. मराठा समाजातील बांधवांनी चर्चेसाठी तयार व्हावे असे मुख्यमंत्र्यांना वाटते हे ही राणे यांनी स्पष्ट केले.