मोबाईलवरून झालेल्या वादातून भावानं मारली चापट, वीजेच्या खांबावर चढला युवक

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – लॉकडाऊन उघडल्यामुळे अनेक ग्रामीण भागात विवाहसोहळे सुरू झाले आहेत. पाडलवा या गावात एक तरूण अचानक हायटेंशन विजेच्या खांबावर चढला.

टीकडी या गावातून पाडलवा या गावात आपल्या बहिणीच्या लग्नासाठी तरुण आणि त्याचे कुटुंब आले होते. येथे गोविंद मेडा तरुणाचा मोबाइलवरून आपल्या मोठ्या भावाशी वाद झाला, तेव्हा मोठ्या भावाने त्याला थोबाडीत मारली. यामुळे संतप्त झालेला गोविंद हायटेंशन विद्युत खांबावर चढला. याबाबत माहिती गावकऱ्यांपर्यंत पोहोचताच तेथे गर्दी झाली.

सुमारे अडीच ते दोन तास समजून सांगितल्यानंतर तो खाली उतरला आणि त्या युवकाला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेले. पोलिस ठाण्यात समजावून झाल्यावर त्याला त्याच्या कुटूंबाकडे देण्यात आले. या युवकाचे वय केवळ १४ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. तहसीलदार रवींद्र चौहान आणि टीआय दिनेश भवर हे पूर्ण स्टाफ घेऊन पाडलवा येथे पोहोचले आणि कुटुंबीयांकडून त्या युवकाला समजावून सांगितले, पण तो उतरला नाही. सुमारे २ तास सांगूनही तो खाली उतरण्यास तयार झाला नाही. यानंतर प्रशासन टीम पोलिसांच्या लेडी कॉन्स्टेबल तिथेच थांबल्या, ज्या त्याला समजावत राहिल्या.

बहिणीने समजावल्यानंतर उतरला खाली
प्रशासन गोविंदला समजावण्यास अयशस्वी झाले. यानंतर महिला कॉन्स्टेबल असलेल्या त्याच्या बहिणीने त्याला समजावून सांगितले आणि तेव्हाच तो टॉवरवरुन खाली उतरला. त्या तरुणाने टॉवरवरुन खाली उतरल्यावर सांगितले की, आम्हा भावांमध्ये थोडेसे भांडण झाले होते. दरम्यान काही आणखी ३ लोक आले. त्यांनी माझ्याशी मारामारी सुरू केली. त्यांच्या भीतीने मी टॉवरवर चढलो. आमच्यात थोडे भांडण झाल्याचे तरुणाने सांगितले. मी फक्त त्याला समजावून सांगत होतो, म्हणून त्याला वाईट वाटलं, मग मी त्याला थोबाडीत मारली, तर तो चिडला आणि टॉवरवर चढला आणि शिवीगाळ करायला लागला, एवढाच आमच्यात वाद झाला होता.

चिडल्यामुळे चढला
गोविंदचा त्याच्या भावाशी वाद झाला. यानंतर तो चिडला आणि हायटेंशन इलेक्ट्रिक वायरवर चढला. कित्येक तास समजावून सांगितल्यावर तो खाली उतरला. त्याला समजावून सांगितले आणि नातेवाईकांच्या सुपूर्त केले. तरुणाला मानसिक त्रास आहे. यापूर्वीही त्याने असा प्रकार केला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like