भाजप प्रवेशाची केवळ औपचारिकताच मुख्यमंत्री बोलावतील तेव्हा तयार : विखे पाटील

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – मी निवडणुकीत भाजपचा जाहीर प्रचार केलेला आहे. त्यामुळे आता प्रवेशाची केवळ औपचारिकताच झालेली आहे. मुख्यमंत्री म्हणतील, त्या दिवशी मी तयार आहे, असे ज्येष्ठ नेते पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.

विखे पाटील म्हणाले की, माझा भाजप प्रवेश हा आज मुद्दा राहिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेचं समर्थन करीत त्यांच्या विचारांची भूमिका घेऊन माझी वाटचाल सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा दिवस कधी आणि मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा, याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे विखेंनी सांगितले.

..तो विषय माझ्यासाठी संपला
काँग्रेसबाबत बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणारे अनेक नेते काँग्रेसमध्ये आहेत. या नेत्यांनी आता स्वतः हून बाजूला होऊन नव्यांना संधी देण्याची आवश्यकता आहे. काँग्रेसचा विषय आता माझ्यासाठी संपला आहे.

चार आमदार संपर्कात ?
काँग्रेसचे चार आमदार, अनेक जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक राधाकृष्ण विखे पाटलांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. संबंधित विखे पाटील यांच्यासोबत भाजपात प्रवेश करणार असल्याचे समजते.

आरोग्यविषयक वृत्त

‘या’ कारणामुळे सकाळी उठल्यावर मोबाईलचा वापर शक्यतो टाळाच

धक्कादायक ! भारतीयांचं वयोमान वायू प्रदूषणामुळे तब्बल ‘एवढ्या’ वर्षांनी झाले कमी

Loading...
You might also like