जेंव्हा कियाराच्या आजीने बघितला ‘हा’ सीन, अशी दिली प्रतिक्रिया…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वेब सीरीज पासून प्रसिद्ध झालेली कियारा आडवाणी तिचा आगामी चित्रपट ‘कबीर सिंह’ साठी चर्चेत आहे. कियारा आणि शाहिद कपूर चित्रपटाचा प्रमोशनसाठी एकत्र आले आहेत. नुकतीच ती आता एका चॅट शो मध्ये सहभागी झाली होती. तिने आपल्या ‘लस्ट स्टोरीज’ मध्ये वायब्रेटर सीनचा उल्लेख केला. असे सांगितले जाते की ‘लस्ट स्टोरीज’ मध्ये कियाराचा वायब्रेटर सीन खूप चर्चेत आला होता. या सीन मध्ये बैकग्राउंड ला “कभी खुशी कभी गम” मधील गाणं चालूच राहत. कियारा म्हणाली की तिचा सीन तिच्या आजीने सुद्धा बघितला होता. तिने तिच्या आजीची प्रतिक्रिया बदल बोलताना सांगितले कि तिला तिचा तो सीन खूप आवडला होता.

कियारा म्हणाली की ‘माझी आजी माझ्या सोबत राहण्यासाठी आली होती. त्याच वेळेस नेटफ्लिक्स वर लस्ट स्टोरीज रिलीज झाली होती. अर्थातच मी ते पाहिले होते आणि माझ्या पालकांनी देखील ते सांगितले होते. सगळ्यांना ही वेब सिरीज खूप आवडल होत. या ऑर्गेज्म सीन साठी माझे पालक अस्वस्थ होते. जेंव्हा मी चित्रपटासाठी हो म्हणाले होते तेंव्हा त्यांना सगळं काही माहिती होत.

माझी आजी एंग्लो इंडियन आहे त्यामुळे तिला काही संदर्भ समजले नाहीत. त्यामुळे ती चित्रपटाच्या खाली चालेले टाइटल्स वाचत होती. प्रत्येक जण हसत होते. मला प्रेक्षकांकडून खूप शुभेच्छा मिळत होत्या. जेंव्हा माझीआजी सीरीज बघत होती तेंव्हा तिच्या चेहऱ्यावर काहीच हाव-भाव नव्हते. त्यावेळेस तिने काहीच प्रतिक्रया दिली नव्हती. त्यावेळेस कियाराला वाटत होते की आजीला सीरीज आवडली की नाही ? त्यानंतर कियाराने तिच्या आईला आजीला सीन समजावण्यास सांगितलं. त्यानंतर आजीला तो सीन समजला आणि मग तिला तो सीन खूप आवडला. कियाराचा चित्रपट ‘कबीर सिंह’ २१ जुनला रिलीज होणार आहे. हा चित्रपट संदीप वांगा यांनी दिग्दर्शित केला आहे.

You might also like